जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कुत्र्याचं पिल्लू समजून जोडप्याने घरी आणला भयंकर प्राणी; 24 तासातच लक्षात आली चूक, पण...

कुत्र्याचं पिल्लू समजून जोडप्याने घरी आणला भयंकर प्राणी; 24 तासातच लक्षात आली चूक, पण...

कुत्र्याचं पिल्लू समजून जोडप्याने घरी आणला भयंकर प्राणी; 24 तासातच लक्षात आली चूक, पण...

सोशल मीडियावर एका जोडप्याची कहाणी शेअर करण्यात आली, ज्यांनी कुत्र्याचं पिल्लू समजून एका धोकादायक प्राण्याला आश्रय दिला (Couple Brought Dangerous Animal at Home).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 मे : मुक्या प्राण्यांबद्दलही माणसाच्या मनात प्रेम असायला हवं. हे प्रेम खूप महत्त्वाचं आहे. माणसांना प्राण्यांची ओढ नसेल तर कदाचित अनेक प्राणी जगू शकणार नाहीत. परंतु अनेक वेळा प्राण्यांबद्दल असणारं अति आकर्षण माणसासाठी धोकादायक ठरतं. सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याची कहाणी शेअर करण्यात आली, ज्यांनी कुत्र्याचं पिल्लू समजून एका धोकादायक प्राण्याला आश्रय दिला (Couple Brought Dangerous Animal at Home). अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जोडप्याला हा प्राणी ओळखता आला नाही. सुदैवाने हा प्राणी अजूनही लहान होता. अधिकाऱ्यांनी या प्राण्याला तातडीने पुनर्वसन केंद्रात नेलं. छातीवर चढून श्वानाने मालकाला नदीच्या पाण्यात ढकललं; कॅमेऱ्यात कैद झाली घटना, पाहा VIDEO मॅसॅच्युसेट्समध्ये राहणार्‍या या कुटुंबाने कुत्रा समजून घरात ज्याला आश्रय दिला होता, ते खरं तर कोयोट होतं. त्याला अमेरिकन जॅकल किंवा लांडगा असंही म्हणतात. हे पिल्लू आपल्या कळपापासून वेगळं होऊन रस्त्यावर एकटंच भटकत होतं. त्यानंतर या कुटुंबाची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी तात्काळ त्याला गाडीत बसवून घरी आणलं. मात्र, काही काळाने त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी मदतीसाठी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

News18

न्यू इंग्लंड वन्यजीव केंद्राच्या प्रवक्त्या नीना यांनी सांगितलं की, हे पिल्लू २४ तासांपेक्षा कमी काळ कुटुंबासोबत होतं. 23 एप्रिल रोजी त्यांनी त्याला रस्त्यावरून उचलून आणलं. पथकाने या पिल्लाला घराबाहेर काढल्यानंतर त्याची तपासणी केली. त्याला रेबीज किंवा कोणताही आजार नव्हता. त्याला पुनर्वसनासाठी नेण्यात आलं आहे, तिथे त्याला एक जोडीदार दिला जाईल. हा जोडीदार पिल्लाची काळजी घेईल. जेव्हा पिल्लू जंगलात राहण्यास तयार होईल तेव्हा त्याला परत सोडण्यात येईल. आई कांगारूप्रमाणे पेहराव करून आला व्यक्ती; बघताच पिल्लाने केलं हे काम, मन जिंकणारा VIDEO या प्राण्याला पुनर्वसन केंद्रात बरंच काही शिकवलं जाईल. सर्व प्रथम त्याला लस दिली जाईल, जेणेकरून ते निरोगी राहील. याशिवाय मोठ्या परिसरात खुलं ठेवून तेथे अनेक प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुनर्वसन अधिकारी प्राण्यांना त्यांचं पालक ज्या गोष्टी शिकवतात तेच शिकवण्याचा प्रयत्न करतात. राज्याच्या वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या पिल्लासोबत मादा कोयोटने सात ते आठ इतर पिल्लांना जन्म दिला असेल. मात्र, हे पिल्लू गटातून भटकलं. सुदैवाने ज्या कुटुंबाने त्याला आपल्या घरी नेलं होतं, त्यांना काहीही इजा केली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात