मुंबई, 03 मे : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे मनोरंजक तर कधी धक्कादायक असतात. येथे आपल्याला कधीकधी असे व्हिडीओज देखील पाहायला मिळतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील होऊन बसतं. सोशल मीडियावर आता अनेक जुगाडाचे व्हिडीओ पाहायला मिळतात. भारतातच नाही तर आता जगभरातील लोक जुगाडू झाले आहे. काही जुगाड हे फेल आहेत. तर काही जुगाड हे खरोखरंच फायद्याचे आहे. जुगाडासाठी लोक आपले कौशल्ये वापरतात. पण कधी-कधी काही जुगाड हे अंगाशी देखील येऊ शकतात. अशीच एक घटना पाकिस्तानातील कराचीमध्ये पाहायला मिळाली ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. लोकांना हा व्हिडीओ आश्चर्य वाटू लागलं आहे. जुन्या कारच्या बंपरला जोडलेल्या पिंजऱ्यासारख्या कंटेनरमध्ये तीन मुले प्रवास करताना पाहिल्यावर कराचीतील प्रवासी थक्क झाले. हे लोकांच्या विचाराच्या पलीकडचे आहे, पण व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक थक्क झाले. Video : मजुरांच्या जुगाडासमोर मोठ-मोठे इंजिनिअर्स ही फेल, एकदा हा जुगाड पाहाच व्हिडीओत नक्की काय आहे? एका एक्स्प्रेसवेवर अतीवेगाने गाडी धावताना तुम्ही पाहू शकता. पण या गाडीच्या मागिल बाजूला एक पिंजरा लावण्यात आला आहे आणि या पिंजऱ्या 3 लहान मुलं बसली आहेत. हा व्हिडीओ कराची मधला असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरंतर एक संपूर्ण कुटुंब या कारनं प्रवास करत होतं, अशा वेळी लोकांना बसायला जाग कमी पडत होती, म्हणून या कुटुंबातील मोठ्या सदस्यांनीच हा जुगाड करुन घेतला. त्यांनी कारच्या मागच्या बाजूला पिंजरा बांधला आणि मग त्यामध्ये या तीन मुलांना बसवलं. मासे पकडण्यासाठी चिमुकल्याचा अजब जुगाड, Video पाहून नेटकरी कौतुक करताना थकत नाहीत व्हिडीओत पुढे एक मुलगी या पिंजऱ्यामधून उभी राहिलेली तुम्ही पाहू शकता. शिवाय ही गाडी अती वेगाने धावत आहे. या गाडीच्या मागची काच देखील नाहीय. हा संपूर्ण प्रकार मागून येणाऱ्या एका कारमधील लोकांनी आपल्या कॅमेरात कैद केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ट्राफिकचे सगळे नियम मोडून या कारच्या ड्रायव्हरने कार चालवली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच यावर लोकांनी जोरदार कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. शिवाय हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओने युजर्सना विचार करायला लावले आहे. अनेकांनी कारच्या मालकाला फटकारले आहे. ऑटोमोबाईल इंस्टाग्राम पेजवर “टॅग करो कराची वाला को” या कॅप्शनसह व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड करताना, बॅकग्राउंडला लोक मनापासून हसताना ऐकू येतात. ही कार माणसांनी खचाखच भरल्याचे क्लिपमध्ये दिसत आहे.