मुंबई : जुगाडाच्या बाबतीत भारतीय कधीच मागे नाहीत हे भारतीयांनी अनेक वेळा दाखवून दिलं आहे. आता देखील या संबंधीत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला कौतुक करावसं वाटेल. हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे. ज्याने मासे पकडण्यासाठी एक वेगळीच युक्ती लावली, ज्याचा व्हिडीओ काढला गेला आणि तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि व्ह्यूज आले आहेत. लोकांनी या मुलाचं भरभरुन कौतुक देखील केलं आहे. मासे पकडण्यासाठी या चिमुकल्याने अशा तंत्राचा वापर केला होता, की लोक व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. Jugad : एकापेक्षा एक भन्नाट देसी जुगाड, Viral फोटो पाहून चक्रावाल या मुलाने तलावाच्या काठावर लाकडाच्या साहाय्याने खड्डा पाडला आणि त्याच्यामधोमध मासे पकडण्याचा गल आणि दोरा लाबला. त्यानंतर गलाला त्याने पिठाचे छोटे गोळे लावले आणि ते पाण्यात टाकले. काही वेळाने हा लाकडामध्ये लावलेला दोरा हलू लागला आणि जोरात फिरु लागला, त्यानंतर या चिमुकल्याने जाऊन तो दोऱ्याचा रिल पकडला आणि तो आपल्या बाजूने गोल-गोल फिरु लागला, ज्यामुळे त्याला माशांना पाण्याबाहेर काढण्यात मदत मिळाली. ज्यानंतर या चिमुकल्याने माशांच्या तोंडातील गल काढला आणि मासे आपल्याकडील पिशवित भरले.
तुम्ही पाहू शकता ही बलाचा वापर न करता फक्त बुद्धीचा योग्य वापर करुन या चिमुकल्याने मोठे दोन मासे पकडले, जे त्यांना पोट भरण्यासाठी पुरेसे आहे. या लहानग्याची मासे पकडण्याची हिच पद्धत नेटकऱ्यांना आवडली, ज्यामुळे त्यांनी या मुलाचं कौतुक केलं आहे.
हा व्हिडीओ @Figensport ट्विटर युजरने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना वापरकर्त्याने लिहिले की दृढनिश्चय + साधेपणा + संयम = यश. @margaretsfun वापरकर्त्याने लिहिले की हे मासेमारीचे नवीन तंत्र आहे. एका युजरने लिहिले की, माझ्या पुतण्याने 2000 रुपये खर्च करून फिशिंग गियर विकत घेतले होते, पण त्याने तेवढ्या पैशांचा तो मासे पकडू शकला नाही. लोकांनी या व्हिडीओवर आणखी वेगवेगळे आणि मनोरंजक कमेंट्स लिहिल्या आहेत.