जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video : मजुरांच्या जुगाडासमोर मोठ-मोठे इंजिनिअर्स ही फेल, एकदा हा जुगाड पाहाच

Video : मजुरांच्या जुगाडासमोर मोठ-मोठे इंजिनिअर्स ही फेल, एकदा हा जुगाड पाहाच

देसी जुगाड

देसी जुगाड

सध्या अशाच एका देसी जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : जुगाडाच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीही पकडू शकत नाही. रोजच्या वापरातील एखादी वस्तू, खराब झाली किंवा दुरुस्त करावी लागली, तर तर न करता भारतीय लोक त्यावर वेगळाच पर्याय शोधून काढतील. त्यांचा हा जुगाड साध्या वस्तूंपासून केलेला असला तरी देखील तो तात्पूर्ता नसतो, तर तो अनेक काळ टिकतो. यासंबंधीचे तुम्ही अनेक व्हिडीओ देखील पाहिले असतील. सध्या अशाच एका देसी जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. बिल्डिंग बनवणाऱ्या साध्या मजूरांनी हा जुगाड शोधून काढला आहे, त्यांच्या या जुगाडासमोर मोठ-मोठे इंजिनिअर्स देखील फेल आहेत. Jugad : एकापेक्षा एक भन्नाट देसी जुगाड, Viral फोटो पाहून चक्रावाल व्हिडीओत या मजुरांनी पत्रा इमारतीच्या वर नेण्यासाठी जुगाड केला आहे. सुरूवातीला तुम्ही बघू शकता की, सिमेंटचा पत्रा पहिल्या मजल्यावर नेण्यासाठी अनेक लोक एकत्र काम करत आहेत. यामध्ये तुमच्या लक्षात आले की, एका व्यक्तीने सिमेंटचा पत्रा दोरीने बांधला आहे आणि नंतर बांबूवर त्यांना ठेवलं आहे. पुढे त्या पत्र्याला वर नेण्यासाठी दोन दोरखंड बांधले आहे आणि वर उभ्या असलेल्या दोन लोकांनी तो पकडला. त्यानंतर एक तरुण खाली उडी मारतो आणि एका सेकंदात दोरी आणि बांबूच्या साहाय्याने जड सिमेंटचा पत्रा वर पोहोचतो.

News18लोकमत
News18लोकमत

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहताच लोकांना धक्काच बसला. मजुरांनी हा विचार कसा केला यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. बिलाल अहमद नावाच्या युजरने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत शेकडो लोकांनी त्याला लाईक केले आहे, तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

जाहिरात

एका यूजरने लिहिले की, “ही एक उत्तम युक्ती आहे.” लोकांना खरोखरंच या मजुरांच्या युक्तीचा हेवा वाटत आहे. शेतकरी आणि मजुरांनी वापरलेला देसी जुगाड सोशल मीडियावर खूप पसंत केला जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात