जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्त्याच्याकडेला मस्ती करणं तरुणाला पडलं महागात, धावताना समोरुन आली कार आणि...Video व्हायरल

रस्त्याच्याकडेला मस्ती करणं तरुणाला पडलं महागात, धावताना समोरुन आली कार आणि...Video व्हायरल

रस्त्याच्याकडेला मस्ती करणं तरुणाला पडलं महागात, धावताना समोरुन आली कार आणि...Video व्हायरल

तुम्ही पाहू शकता की दोन-तीन तरुण तेथे रस्त्यावरुन इकडे तिकडे पळत आहेत. हे दृष्य तस पाहतानाच आपल्या पोटात गोळा येऊ लागेल. परंतू या तरुणांना त्यांच्या मौजे पुढे काहीच नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 30 ऑगस्ट : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात जे फारच मनोरंजक असतात. तसेत आपल्याला येथे अनेक अपघातांचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. जे आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात आणि आपल्याला अशी चूक करण्यापासून रोखतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. हा व्हायरल व्हिडीओ एका अपघाताचा आहे. ज्या या व्यक्तीच्याच मूर्खपणामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले आहे. खरंतर आपण जेव्हा आपल्या मित्रांसोबत मजा मस्ती करतो, तेव्हा आपल्याला संपूर्ण जगाचा विसर पडतो आणि हे चांगलं देखील आहे. परंतू असं असलं तरी आपल्या जीवाची पर्वा तरी आपण करालाच हवी. हे वाचा : तिने एक सेल्फी घेतली आणि सहा लोकांचा जीव गेला… वाचा काय आहे हे प्रकर हा व्हायरल व्हिडीओ एका हायवेजवळील आहे. ज्याच्या बाजूला पाणी साचलेलं आहे, ज्यामध्ये मजा करण्यासाठी काही तरुण जमले आहे. व्हिडीओमध्ये आपल्याला हे स्पष्ट दिसत आहे की ही तरुण मंडळी स्विमिंगच्या पेहरावात आहे. परंतू हे सगळं करत असताना ही तरुण मंडळी एक सगळ्यात मोठी चुक करतात की, ते रस्त्याच्यामध्ये जाऊन उभे राहातात आणि जोरात धावत येऊन या साचलेल्या पाण्यात उडी मारतात. हे वाचा : वेगवान बाईकची कारला टक्कर, त्यानंतर जे घडलं ते थक्कं करणारं; घटनेचा Video Viral तुम्ही पाहू शकता की दोन-तीन तरुण तेथे रस्त्यावरुन इकडे तिकडे पळत आहेत. हे दृष्य तस पाहतानाच आपल्या पोटात गोळा येऊ लागेल. परंतू या तरुणांना त्यांच्या मौजे पुढे काहीच नाही. पुढे एक तरुण पाण्यातून पुन्हा बहेर येतो आणि पाण्यात उडी मारण्यासाठी तो रस्त्यावर येतो. परंतु तेव्हाच एक वेगवान गाडी समोरुन येते आणि ती या तरुणाला धडकते. कारने धडक देताच हा तरुण उंच हवेत उडाला आणि रस्त्यावर खाली आदळला. हा तरुण जीवतं आहे की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. परंतु हा अपघात पाहून तुमच्या अंगावर नक्कीच काटा उभा रहिला असेल.

जाहिरात

हा व्हिडीओ A° नावाच्या अकाउंटवरुन ट्वीटरवरती शेअर करण्यात आला आहे. ज्याला ८१ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. अवघ्या काही सेकंदांचा हा ट्रेंडिंग व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. इतकेच नाही तर अनेक लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही सल्लेही दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात