मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तिने एक सेल्फी घेतली आणि सहा लोकांचा जीव गेला... वाचा काय आहे हे प्रकरण

तिने एक सेल्फी घेतली आणि सहा लोकांचा जीव गेला... वाचा काय आहे हे प्रकरण

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तीन कुटुंब पिकनिकसाठी एका धबधब्यावर पोहोचले होते. जेव्हा एक मुलगी सेल्फी घेण्यासाठी पाण्याजवळ गेली. पण यानंतर काही विचित्र घडलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 29 ऑगस्ट : सेल्फी घ्यायला कोणाला आवडत नाही? आपल्या आजूबाजूलाच आपल्याला असे अनेक लोक पाहायला मिळतील, जे स्वत: एकटे किंवा आपल्या मित्र-परिवारासोबत सेल्फी घेताना पाहायला मिळतात. त्यात कुठेही सहलीला गेले तर लोक सेल्फी घेणं कधीही चूकवत नाहीत. हे सेल्फी काढून लोक आपल्या सोशल मीडियावर शेअर करतात आणि लोकांमध्ये पॉप्यूलर होतात. परंतु सेल्फी घेताना अनेक लोक बऱ्याचदा आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत आणि ज्याची त्यांना शिक्षा देखील मिळते. ज्यामुळे सेल्फी घेणं अनेकांच्या जणांच्या जीवावर बेतल आहे. याबाबत अनेक बातम्या देखील आपण ऐकल्या आहेत. शिवाय यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील आपल्या समोर आले आहेत.

सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्याबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल. इथे एका मुलीच्या सेल्फीच्या मोहामुळे संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या दारात ढकललं गेलं. या अपघाताला 7 लोक बळी पडले, ज्यातील एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात आले. परंतु 6 जणांचा मात्र यात मृत्यू झाला.

ही संपूर्ण घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. खरंतर तीन नातेवाईक कुटुंब पिकनिकसाठी एका धबधब्यावर पोहोचले होते. जेव्हा एक मुलगी सेल्फी घेण्यासाठी पाण्याजवळ गेली. परंतु तेव्हा तिचा तोल गेला, ज्यामुळे ती खोल पाण्यात पडली. तिला पाण्यात पोहोता येत नसल्यामुळे तिला वाचवण्यासाठी आणखी 6 जणांनी एकामागून एक उडी मारली, परंतु ते देखील पाण्यात बुडाले.

हे वाचा : वेगवान बाईकची कारला टक्कर, त्यानंतर जे घडलं ते थक्कं करणारं; घटनेचा Video Viral

हे दृश्य स्थानिकांनी पाहाताच. त्यांनी या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सुलेखा सिंग या महिलेला गावकऱ्यांनी वाचवले, मात्र इतर ६ जण पाण्यात बुडाले. त्यानंतर या घटनेची माहिती जिल्हा प्रशासन, कोरिया यांना देण्यात आली. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, ज्यांनी रात्री उशिरापर्यंत ३ मृतदेह बाहेर काढले. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून बचावकार्य सुरू करण्यात आले. ज्यानंतर सगळे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेत हिमांशू, रत्नेश, श्रद्धा, ऋषभ, श्वेता आणि अभय यांचा मृत्यू झाला आहे.

ही संपूर्ण घटना छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील आहे. हे कुटूंब मध्यप्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील आहे, जे छत्तीसगडमधील रामदहा धबधब्यावर सहलीसाठी गेले होते. येथे सेल्फी घेताना श्रद्धा सिंह अचानक धबधब्यात बुडू लागली. हे पाहून तिची मोठी बहीण श्वेता सिंग तिला वाचवण्यासाठी खोल पाण्यात गेली. श्वेता आणि श्रद्धा दोघेही बुडाले. हे पाहून तेथील लोकांनी आरडाओरडा सुरू केला. अखेर हिमांशू याने आपल्या दोन बहिणींना वाचवण्यासाठी धबधब्यात उडी मारली.

हे वाचा : 'तो' एकटा आणि चारही बाजूंनी विषारी सापांनी घेरलं; जगातील सर्वात खतरनाक Snake Rescue Video

हे सगळे जेव्हा बुडू लागले तेव्हा रत्नेश सिंग आणि अभय सिंग या दोघांनीही पाण्यात उडी घेतली. यांना वाचवण्यासाठी ऋषभ सिंह याने उडी घेतली, त्यानंतर आपला नवरा बाहेर आला नाही हे पाहून सुलेखा सिंगने देखील पाण्यात उडी घेतली. ज्यामुळे एकून 7 लोकांनी पाण्यात उडी घेतली, ज्यामध्ये फक्त एका महिलेचे प्राण वाचले आहे.

First published:

Tags: Shocking accident, Shocking news, Top trending, Viral news