मुंबई : सोशल मीडिया हे मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच इथे जुगाडाचे व्हिडीओ देखील व्हायरल होताता. सध्या असाच एक व्हिजीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ एका जुगाडाचा व्हिडीओ आहे. जो पाहून तुम्हाला वाटेल की या व्यक्तीचं कौतुक करावं की त्याला मुर्खपणा म्हणावा. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने जुगाडसोबत असे काही केले आहे, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. एका व्यक्तीने उष्णतेवर मात करण्यासाठी जुगाडातून पंखा बनवला हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण जुगाड इतका धोकादायक आहे की, लोक या व्यक्तीला सल्ले देऊ लागले. असा जुगाड त्याने करु नये. ‘हा’ जुगाड की मुर्खपण 3 मुलांना पिंजऱ्यात बंद करुन पळवली कार आणि मग… Video Viral व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, ती व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी झोपून आराम करत आहे. पंख्याची सोय नाही, त्यामुळे उष्णतेपासून वाचण्यासाठी व्यक्तीने ड्रिलिंग मशिनमधूनच पंखा बनवला आहे. त्या व्यक्तीने ड्रिलिंग मशीनला लोखंडी रॉडला उलटे टांगले आणि त्यात त्याचा शर्ट अडकवला. त्याने मशीन सुरू केली आणि मशीनचा पुढचा भाग फिरताच त्याला बांधलेला शर्टही पंख्यासारखा फिरू लागला. असे केल्याने शर्ट पंख्याच्या ब्लेडप्रमाणे हवा देऊ लागतो. Video : मजुरांच्या जुगाडासमोर मोठ-मोठे इंजिनिअर्स ही फेल, एकदा हा जुगाड पाहाच सिव्हिल इंजिनियरिंग नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या पेजवर तुम्हाला असे अनेक मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतील. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
अनेकांना या मशिनची भिती वाटत आहे. कारण ही मशिन जर खाली पडली तर यामुळे या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो.