नवी दिल्ली 13 सप्टेंबर : प्राण्यांच्या व्हिडिओला (Animal Videos) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. तुम्ही प्राण्यांना खेळताना, काहीतरी अॅक्शन करताना आणि नाचताना अनेकदा पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी एखाद्या प्राण्यानं दुसऱ्या आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्याला कंट्रोल केल्याचं कधी पाहिलंय का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की कुत्र्यांना (Dog Cute Video) जगातील सर्वाधिक समजदार प्राणी का म्हटलं जातं. पैसे कमावण्यासाठी शिक्षिकेनं निवडला भलताच मार्ग; आता लाखो रुपये आहे कमाई, पण… तुम्ही आजपर्यंत कुत्र्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असती, ज्यात ते भांडताना दिसतात. तर, कधी माणसांसोबतची त्यांची घनिष्ट मैत्री पाहायला मिळते. मात्र, सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात एक छोटासा कुत्रा एका घोड्याला कंट्रोल करताना दिसतो. हा व्हिडिओ पाहण्यासारखा आहे.
"Don't worry friend, I will guide you!" 🤣🐴🐶#viralhog #corgi #puppy #horse #feelgood pic.twitter.com/DIxTiRcls5
— ViralHog (@ViralHog) September 4, 2021
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की कुत्रा घोड्याचा लगाम आपल्या दातांने पकडून पुढे चालत आहे आणि विशेष बाब म्हणजे घोडाही या कुत्र्याच्या मागे मागे चालत आहे. कुत्रा आणि घोड्याची ही मैत्री लोकांचं मन जिंकत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरनं म्हटलं, की कदाचित आपल्या याच गुणांमुळे हा प्राणी माणसांचा आवडता आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की कुत्रा आणि घोड्याची ही मैत्री खरंच पाहण्यासारखी आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हत्तीही झाला गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन; दर्शनाचा खास Video होतोय व्हायरल हा मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर ViralHog नावाच्या एका यूजरनं शेअर केला आहे. यासोबतच या व्हिडिओ कॅप्शनही देण्यात आलं आहे. यात लिहिलं आहे, की काळजी करू नको, मी तुला गाईड करेल. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 28 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.