Home /News /viral /

हत्तीही झाला गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन; दर्शनाचा खास Video होतोय व्हायरल

हत्तीही झाला गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन; दर्शनाचा खास Video होतोय व्हायरल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मंदिरातील पुजारी गणपतीची आरती (Ganesh Aarti)करण्यात व्यग्र आहे. मंदिराच्या आसपास काही अंतरावर भक्त उभा आहेत. तिथेच एक हत्तीही उपस्थित होता

    नवी दिल्ली 13 सप्टेंबर : प्राण्यांच्या भावना समजून घेणं सोपं नसतं. माणूस बोलून किंवा हावभावातूनच बरंच काही व्यक्त करतो मात्र प्राण्यांसाठी हे सोपं नसतं. देशभरात सध्या गणेश (Lord Ganesha) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच दरम्यान आता एका हत्तीचा अत्यंत खास व्हिडिओ व्हायरल (Elephant Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही (Shocking Video). प्रेयसीसोबत थट्टा करणं पडलं महागात; आता तिची सेवा करण्यात जातो दिवस तुम्ही कधी कुठल्या प्राण्याला मंदिरात पुजा करताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गणपती मंदिरातील आहे. मंदिरात अनेक भक्त उपस्थित आहेत आणि यातला हत्तीदेखील असाच एक भक्त आहे. हत्तीचा हा खास व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला गेला आहे. वैमानिक बॉयफ्रेंडनं फ्लाईटमध्येच केलं असं काही की लाजली प्रेयसी; रंगली चर्चा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मंदिरातील पुजारी गणपतीची आरती (Ganesh Aarti) करण्यात व्यग्र आहे. मंदिराच्या आसपास काही अंतरावर भक्त उभा आहेत. तिथेच एक हत्तीही उपस्थित होता (Elephant Praying In Ganesh Temple) . हत्ती एकदम शांत उभा आहे. जणू तो मनातच पुजा करत आहे. काही वेळानंतर तो माणसांप्रमाणेच जमिनीवर बसतो. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ बातमी देईपर्यंत 35 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअरही केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Elephant, Ganesh chaturthi, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या