नवी दिल्ली 13 सप्टेंबर : परिस्थिती माणसाला काहीही करण्यास भाग पाडते. काही लोक जास्त पैसे कमवण्यासाठी आपला आनंद, आराम आणि झोप या सर्वाचाच त्याग करतात. मात्र, जगात असेही काही लोक आहेत, जे गरीब असले तरीही पैसे कमवण्यासाठी असं कोणतंही काम करत नाहीत, ज्यामुळे समाज त्यांना नावं
ठेवेल. सध्या सोशल मीडियावर
(Social Media) एक 21 वर्षीय तरुणी चर्चेत आहेत. या तरुणीनं गरीबीतून बाहेर येण्याासाठी असं काम सुरू केलं की यामुळे ती सध्या एकटीच आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, लोकांच्या नजरेत तिचं हे काम चुकीचं आहे.
हत्तीही झाला गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन; दर्शनाचा खास Video होतोय व्हायरल
21 वर्षीय तरुणी माउर्न स्माइल्स एक शिक्षिका
(Teacher) होती. मात्र, तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे, अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे. तिचे दोन लहान भाऊ बहिणही आहेत. मात्र, आर्थिक स्थित अतिशय बिकट असल्यानं कुटुंब चालवणंही कठीण होत होतं. स्माइल्सनं सांगितलं, की अनेकदा तर अशी वेळही आली की त्यांना उपाशीच झोपावं लागलं. स्माइल्स ईएसएल शिक्षिकेप्रमाणे काम करत असे. तिला एका तासासाठी 1 डॉलर म्हणजेच एका महिन्याचा सुमारे 26 हजार रुपये पगार मिळायचा. मात्र, तरीही कुटुंबाचा गाडा चालवणं कठीण होत असे. डेली स्टारसोबत बोलताना तिनं सांगितलं, की तिचे वडील कन्स्ट्रक्शन ड्रायव्हर आहेत तर तिची आई दुसऱ्यांच्या घरात साफसफाईचं काम करते. ती आठ वर्षाची असतानापासूनच आपल्या भाऊ बहिणीचा सांभाळ करते. घरातील ही परिस्थिती पाहून स्माइल्स हैराण झाली होती. यामुळे पैसे कमवण्यासाठी तिनं शिक्षिकेची नोकरी सोडून दुसरा रस्ता
(Lady Teacher Turned Adult Star) शोधला.
बापरे..! कोब्रा नागानं गिळली घोणस; विषारी सापाची दुसऱ्या विषारी सापाकडून शिकार
तिनं सांगितलं, की 2019 मध्ये तिला पहिल्यांदा अॅडल्ट सब्स्क्रिपशन साईट ओनली फॅनबद्दल समजलं. या साईटवर मॉडेल आपले बोल्ड आणि न्यूड फोटो पोस्ट करतात. ही साईट फ्री नाही तर लोकांना पैसे देऊन सब्सक्राईब करावं लागतं. या शिक्षिकेनंही या साईटवर आपलं अकाऊंट बनवलं आणि केवळ दोन वर्षातच ती लाखो रुपये कमवू लागली. आता तिनं इतकी कमाई केली आहे, की आपल्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी सहजरित्या सांभाळत आहे. आता ती अनेकदा आपल्या कुटुंबीयांसोबत बाहेर फिरायलाही जाते. लवकरच एक चांगलं घर विकत घेण्याची आता तिची इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.