निशा राठोड, प्रतिनिधी उदयपूर, 10 जुलै : कोकणात येत्या 15 जुलैपर्यंत चांगला आणि राज्याच्या उर्वरित भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यांमध्ये सध्या पुरेसा पाऊस सुरू आहे. अनेक नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अशात राजस्थानच्या उदयपूरमध्ये अवैध मासेमारी करणाऱ्यांना जणू रान मोकळं झालं आहे. ही मासेमारी सुरू असतानाच एक विचित्र घटना घडली. माश्यांसाठी लपूनछपून टाकलेल्या जाळ्यात मगरीचं पिल्लू अडकलं आणि सर्वांची एकच भांबेरी उडाली. उदयपूर शहरातील अहार नदीकिनारी काही तरुण मासेमारीसाठी मोठ्या उत्साहात दाखल झाले होते. उत्साहाच्या भरातच त्यांनी नदीत जाळं टाकलं आणि वर खेचलं. जाळं वर खेचताच त्यात लहानशी मगर आल्याचं दिसलं आणि सर्वजण प्रचंड घाबरले, त्यांनी जाळं तिथेच टाकलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हजारो लोक मगरीचं पिल्लू पाहायला नदीकिनारी दाखल झाले. याबाबत वनविभागालाही माहिती देण्यात आली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मगरीचं पिल्लू जाळ्यातून काढलं. थोड्यावेळाने त्याला जवळच्या बगादरा उद्यानात सुरक्षितरीत्या सोडलं. तेव्हा कुठे शहरातील लोकांच्या जीवात जीव आला. ‘माझा छळ करणारा एक सुपरस्टार…’ सलमानवर पुन्हा भडकली एक्स गर्लफ्रेंड; नाव न घेता साधला निशाणा दरम्यान, यापूर्वी लोकांना याठिकाणी अनेकदा मोठी मगरसुद्धा दिसली होती. आता मगरीचं पिल्लू सापडल्याने आणखी काही मगरी नदीत असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अवैध मासेमारी करणाऱ्यांना यावेळी अधिकाऱ्यांनी चांगलंच फटकारलं.