मुंबई, 10 जुलै : बॉलिवूडचा भाईजान या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहतो. बहुतेक तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त होते. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. काही दिवसांपूर्वीच त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अलीने त्याच्याविषयी एक पोस्ट करत धक्कादायक खुलासा केला होता. सलमानवर तिने अनेक आरोप केले होते. मात्र काही वेळातच तिने ती पोस्ट डिलीट केली होती. आता काही काळानंतर सोमीने पुन्हा एक पोस्ट शेअर करत सलमानचं नाव न घेता त्याच्याविषयी खुलासा केला आहे. सोमी अलीची ही पोस्ट पुन्हा चर्चेत अली आहे. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत एक क्रिप्टीक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलासा करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये सलमानचं नाव न घेता, ‘माझा गैरवापर करणारा आता सुपरस्टार झाला आहे’ असं म्हणत भाईजानवर निशाणा साधला आहे.
सोमी अलीने या पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘पुन्हा मला ही पोस्ट हटवण्यास सांगितले जाईल. लोक माझ्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करतील. माझ्या दारू पिण्याच्या सवयींबद्दल बोललं जाईल, तरीही मी आवाज उठवणं चालू ठेवेन. कारण तुम्ही त्या अपमानाचा आणि छळाचा सामना कलेला नाही. तेव्हा कोणीही माझ्या पाठीशी उभे राहिले नाही कारण माझा छळ करणारा व्यक्ती एक सुपरस्टार होता. माझे मित्रही त्याच्या पाठीशी उभे राहिले. कारण तो तुमचे करिअर एकतर बनवू शकतो किंवा बिघडवू शकतो.’ नातवाच्या लग्नाला गैरहजरी, धर्मेंद्रने मागितली माफी; आता हेमा मालिनींचं नवऱ्याविषयी मोठं वक्तव्य सोमी अलीने पुढे लिहिले की,‘एका अतिशय सुंदर व्यक्तीने सांगितले होते की, शिवीगाळ करणारा व्यक्ती खूप चांगला आहे असं मानायचं.अतिशय सुंदर व्यक्ती आहे. इथे मी त्या अभिनेत्याचा उल्लेख करत आहे ज्याच्याबद्दल मला खूप आदर आहे, पण तो डोळ्यावर पट्टी बांधून का उभा आहे. इथे बघण्यासारखी गोष्ट म्हणजे तू मला कधीच गप्प करू शकणार नाहीस. एक भयपट चित्रपट ज्याचा शेवट आनंदी असेल.’ असं ती म्हणाली आहे.
यासोबत सोमीने तिच्या पोस्टमध्ये सलमान खान, सुभाष घई, जिया खान, बिल कॉस्बी आणि हार्वे वाइनस्टीन असे हॅशटॅग वापरले आहेत. याआधीही सोमी अलीने तिच्यासोबत झालेल्या असभ्य वर्तनाबद्दल अनेकदा खुलासा केला आहे. सोमी अलीने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले होते. पण 90 च्या दशकापासून ती फिल्मी दुनियेत सक्रिय राहिली नाही आणि परदेशात स्थायिक झाली. सोमी अलीचे नाव सलमान खानसोबतही जोडले गेले आहे. सोमी अली ही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आहे.