Home /News /viral /

सिगारेट ओढणारा खेकडा कधी पाहिला आहे? VIDEO पाहून बसणार नाही विश्वास!

सिगारेट ओढणारा खेकडा कधी पाहिला आहे? VIDEO पाहून बसणार नाही विश्वास!

Crab Found Smoking Cigarette Video: हा खेकडा काय करतो आहे पहाच! डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

  मुंबई, 9 मार्च : खेकडा कायमच ओळखला जातो तो त्याच्या चालीवरून. खेकडा सतत वाकडा चालत असतो. शिवाय खेकड्यांबाबत अजून एक गोष्ट प्रसिद्ध आहे. (Crab video viral on Instagram) ती म्हणजे अनेक खेकडे एकत्र आल्यावर ते एकमेकांचे पाय खेचतात. कुणीच कुणाला पुढं जाऊ देत नाही. यातून एकमेकांचे पाय खेचणाऱ्या माणसांनाही अनेकदा खेकड्यांची उपमा दिली जाते. (Crab video) आता एका खेकड्याचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, की पाहून खरोखर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओमध्ये एक खेकडा चक्क सिगारेट ओढतो आहे. हेही वाचा VIDEO: डोक्यावर ऊन आणि कुशीत तान्हं बाळ, कर्तव्य बजावतेय वर्दीतील झाशीची राणी हिंदी भाषेतील पत्रकार ज्योती यादव यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Instagram viral video of crab)
  या छोट्याशा व्हिडिओत खेकड्यानं चक्क आपल्या नांगीमध्ये सिगारेट पकडली आहे. ही सिगारेट पकडून तो तोंडाकडे नेतो आणि ओढून धूरसुद्धा काढतो. मग ही जळती सिगारेट नीटपणे नांगीतच धरून तो घेऊन जातो. (crab with cigarette video) हेही वाचा VIDEO: ऑनलाईन सत्रादरम्यान सुरू राहिला वकीलाचा कॅमेरा, सॉलिसिटर जनरल म्हणाले,.. या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं आहे. अनेक लोकांनी यावर विविध कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांना हे पाहून संतापही आला. एकानं कमेंट केली आहे, की पेटलेली सिगारेट ज्यानं कुणी खेकड्याला दिली असेल त्यानं खूप चुकीचं काम केलेलं आहे. (crab smokes cigarette video)
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cigarette, Crab, Facebook, Instagram, Shocking news, Smoking, Viral video.

  पुढील बातम्या