जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: डोक्यावर ऊन आणि कुशीत तान्हं बाळ, पोलिसांचं कर्तव्य बजावतेय वर्दीतील 'झाशीची राणी'!

VIDEO: डोक्यावर ऊन आणि कुशीत तान्हं बाळ, पोलिसांचं कर्तव्य बजावतेय वर्दीतील 'झाशीची राणी'!

VIDEO: डोक्यावर ऊन आणि कुशीत तान्हं बाळ, पोलिसांचं कर्तव्य बजावतेय वर्दीतील 'झाशीची राणी'!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला वाहतूक पोलीस अधिकारी (Women traffic Police Officer) आपल्या अवघ्या काही महिन्यांच्या बाळाला ( Doing job with her new born baby ) घेवून आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 06 मार्च: दररोज सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. पण त्या हजारो व्हिडीओत एखादाच व्हिडीओ असा असतो, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला वाहतूक पोलीस अधिकारी (Women traffic Police Officer) आपल्या अवघ्या काही महिन्यांच्या बाळाला (Doing job with her new born baby ) कुशीत घेत आपली सेवा बजावताना दिसत आहे. सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. उन्हाळ्याची चाहुल लागली असून अंगाला भीषण चटके जाणवायला सुरूवात झाली आहे. असं असताना आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन या वाहतूक पोलीस अधिकारी आपली सेवा बजावत आहे. त्याचा हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन कौशिक यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, ‘ममत्व आणि कर्तव्याचा संगम.’ हा व्हिडीओ चंदीगड येथील असल्याचं समजत आहे. हा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय महिला दिन काही दिवसांवर आला असताना समोर आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांची कणखर बाजू समोर येताना दिसत आहे.

जाहिरात

हातात चिमुकलं बाळ घेवून ऊन, वारा, वाहनांचा कर्कश आवाज, प्रदुषण अशा सर्व समस्या असताना ही महिला शांतपणे आपलं कर्तव्य बजावत आहे. तिच्या या कर्तृत्वाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. पण अनेकांनी पोलीस प्रशासनातील दुरावस्थेवर टिका केली आहे. एका वापरकरत्याने प्रतिक्रिया देत, संबंधित महिलेची ड्युटी वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये लावायला हवी, जेणेकरून तिची आणि बाळाची तारांबळ उडणार नाही. कारण संबंधित महिला जरी तिचं कर्तव्य पार पाडत असली तरी बाळाला विनाकारण उन्हात राहावं लागत आहे.

एकीकडे सेवा बजावत असताना, दुसरीकडे बाळाच्या आरोग्याशी खेळलं जात आहे, अशी प्रतिक्रियाही एकाने दिली आहे. सचिन कौशिक यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास 14 हजार लोकांनी पाहिलं आहे. तर जवळपास दीड हजार लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात