Home /News /viral /

VIDEO: ऑनलाईन सत्रादरम्यान सुरू राहिला वकीलाचा कॅमेरा, सॉलिसिटर जनरल म्हणाले, 'आम्हालाही पाठवा'

VIDEO: ऑनलाईन सत्रादरम्यान सुरू राहिला वकीलाचा कॅमेरा, सॉलिसिटर जनरल म्हणाले, 'आम्हालाही पाठवा'

व्हिडीओमध्ये एक वकील कोर्टाच्या ऑनलाईन सत्रादरम्यान (Virtual Session of Court) हातामध्ये ताट घेऊन जेवणाचा आनंद घेत आहे. मात्र, आपला कॅमेरा सुरूच असल्याची कल्पना या वकीलाला नाही.

    मुंबई 07 मार्च : गेल्या वर्षभरामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननं ऑनलाईन मिटींग आणि झूम कॉलचा वापर वाढला आहे. या काळात कोणाचे कॅमेरे तर कोणाचे माईक सुरू राहिल्यानं झालेली फजिती आपण अनेकदा पाहिली आहे. यातील अनेकजण तर अगदी ट्विटरवर ट्रेंडही झाले आहेत. आता असाच आणखी एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक वकील कोर्टाच्या ऑनलाईन सत्रादरम्यान (Virtual Session of Court) हातामध्ये ताट घेऊन भोजनाचा आनंद घेत आहे. मात्र, आपला कॅमेरा सुरूच असल्याची कल्पना या वकीलाला नाही. हा मजेशीर व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पटना उच्च न्यायालयाचे एक वकील आपल्या हातामध्ये जेवणाची थाळी घेऊन कॉमप्यूटरसमोर बसले आहेत. तर, यातच स्क्रीनवर भारताचे सॉलिसीटर जनरल (Solicitor General of India) तुषार मेहताही दिसत आहेत. या व्हिडीओमधील वकीलांचं नाव श्रत्रशाल राज (Kshatrashal Raj) असं असून अजूनही मेहता कॉलवर आहेत, याची त्यांना कल्पना नाही आणि ते हातात थाळी घेऊन जेवण करत आहेत. आपल्या कॉलचा आवाजही राज यांनी म्यूट केला आहे. त्यामुळे, आवाज जात नसल्यानं तुषार मेहता यात थेट राज यांना कॉल करताना दिसत आहेत. ही बाब लक्षाच येताच राज यांनी आपल्या हातातील प्लेट ताबडतोब खाली ठेवत कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न केला. तर, यानंतर मेहता राज यांची फिरकी घेतना दिसत आहेत. मेहता यात 'यहाँ भेजो' म्हणजेच आम्हाला भोजन पाठवा, असं म्हणताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरताना दिसत आहे. मेहता यांच्या मजेशीर प्रतिक्रियेवर चांगलीच चर्चा रंगली आहे. राज हे एकटे नाहीत ज्यांना कॉलदरम्यान या गोष्टीचा सामना करावा लागला आहे. मागील काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यात आता आणखी एक भर पडली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Court, Online meetings, Shocking video viral, Social media, Viral videos

    पुढील बातम्या