Home /News /viral /

रोमान्स करत असतानाच सुरू झालं फेसबुक लाईव्ह; मग अचानक फोन वाजला अन्.., महिलेनं सांगितला विचित्र अनुभव

रोमान्स करत असतानाच सुरू झालं फेसबुक लाईव्ह; मग अचानक फोन वाजला अन्.., महिलेनं सांगितला विचित्र अनुभव

महिलेनं म्हटलं की फेसबुक लाईव्ह कसं सुरू झालं हे समजलंच नाही. जवळपास 46 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. यातीलच एक तिचे वडिलही होते.

  नवी दिल्ली 14 डिसेंबर : अनेकदा कपल आपले खासगी क्षण रेकॉर्ड करत असतात. अनेक कपल्सचा असा दावा आहे की असं केल्याने त्यांच्यातील प्रेम आणखी वाढतं आणि ते जास्त रोमँटिक मूडमध्ये येतात. मात्र अनेकदा हे खासगी क्षण रेकॉर्ड करणं (Couple Recorded Romantic Moments) जोडप्यांना महागात पडतं. नुकतंच एका महिलेनं आपला असाच अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. नवरदेवाला घेऊन फरार झाला घोडा; कधीही पाहिली नसेल अशी अजब वरात, VIDEO द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, टिकटॉक यूजर @rroberson16 ने नुकतंच एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं की एकदा ती आणि तिच्या पतीसोबत अतिशय लाजीरवाणी घटना घडली. महिलेनं सांगितलं की मागील वर्षी ती आपले इंटिमेट क्षण कॅमेऱ्यात कैद करत होती मात्र अचानक फेसबुक लाईव्ह सुरू झालं (Couple Start Facebook Live During Romance). हे लाईव्ह अनेक लोकांनी पाहिलं. यात महिलेच्या वडिलांचाही समावेश होता. हे वाचूनच तुम्ही हैराण झाला असाल. महिलेनं म्हटलं की फेसबुक लाईव्ह कसं सुरू झालं हे समजलंच नाही. जवळपास 46 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. यातीलच एक तिचे वडिलही होते. महिलेच्या मैत्रिणीने लगेचच तिला फोन करून याबाबतची माहिती दिली. तेव्हा महिलेनं हा व्हिडिओ बंद केला. जेव्हा महिलेला ही बाब समजली की तिच्या वडिलांनीही हा व्हिडिओ पाहिला आहे, तेव्हा तिला शरमल्यासारखं वाटलं आणि एक आठवडा ती वडिलांसमोर गेलीच नाही.

  Booster डोस मिळाल्याचा Booster आनंद, बीचवर जाऊन केलं हॉट फोटोशूट

  महिलेचा पती मात्र अतिशय सपोर्टिव्ह आहे. घटनेच्या एका वर्षानंतरही तो क्षण आठवताच तो हसू लागतो. त्याने महिलेला अजिबातही असं वाटू दिलं नाही की हा चिंतेचा विषय आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत अनेकांनी कमेंट करून हैराणी व्यक्त केली. अनेक लोक तर महिलेचा हा अनुभव ऐकूनच घाबरले. अनेकांनी म्हटलं की हा नवीन प्रकारचा धोका आहे. याबाबत आम्ही सतर्क राहू. एका व्यक्तीने कमेंट करत म्हटलं, की जर माझ्यासोबत असं काही झालं असतं तर माझ्या आत्म्याने त्याचवेळी माझं शरीर सोडलं असतं.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Couple, Romance, Viral news

  पुढील बातम्या