नवी दिल्ली 14 डिसेंबर : सोशल मीडिया (Social Media) लग्नसमारंभ आणि डान्सचे अनेक व्हिडिओ (Wedding and Dance Videos) व्हायरल होत राहतात. इंटरनेटवर लग्नातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे भरपूर व्हिडिओ उपलब्ध आहेत. यातील अनेक व्हिडिओ इतके विनोदी असतात की ते पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ (Funny Wedding Video) पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
बापरे बाप! टॉयलेट सीटवर बसताच कमोडमधून बाहेर आला 5 फूट साप आणि...
आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतात लग्नसमारंभ एखाद्या सणाप्रमाणेच मोठ्या उत्साहात आणि आनंदाच पार पाडले जातात. यासाठी अनेक महिने आधीपासूनच तयारीही सुरू होते. जेणेकरून लग्नात काहीही कसर राहू नये. मात्र, इतकी तयारी करूनही ऐनवेळी काहीतरी गडबड झाली तर सगळ्यांच्याच आनंदावर पाणी फेरलं जातं. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की वरातीदरम्यान घोडा नवरदेवाला घेऊनच पळ काढतो.
View this post on Instagram
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लग्नाच्या वरातीदरम्यान नवरदेव घोड्यावर बसलेला आहे. मात्र इतक्यात शेजारीच एक फटाका वाजतो. फटाक्याचा आवाज ऐकून घोडा घाबरतो. यानंतर लोकांच्या गर्दीतून हा घोडा नवरदेवाला घेऊन वेगात पळून जाते. नवरदेव घोड्याला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. मात्र, घोडा थांबत नाही.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी नवरदेवाची मस्करी केली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअरही केला आहे. यूजर्स या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. काही लोकांनी नवरदेवासाठी चिंताही व्यक्त केली आहे.
एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, घोडा का पळाला हे गुपितही त्याच्यासोबत गेलं. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, घोड्याने नवरदेवाला आणखी एक संधी दिली आहे. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. व्हिडिओमध्ये नवरदेवाची भलतीच फजिती झाल्याचं दिसत असलं तरी नेटकऱ्यांनी मात्र मजेशीर प्रतिक्रिया देत व्हिडिओचा आनंद घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Wedding video