जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Booster डोस मिळाल्याचा Booster आनंद, बीचवर जाऊन केलं हॉट फोटोशूट

Booster डोस मिळाल्याचा Booster आनंद, बीचवर जाऊन केलं हॉट फोटोशूट

Booster डोस मिळाल्याचा Booster आनंद, बीचवर जाऊन केलं हॉट फोटोशूट

आपला आनंद कोण, कसा साजरा करेल सांगता येत नाही. कोरोनाचा बुस्टर डोस मिळाल्याचा आनंद एका मॉडेलनं अनोख्या पद्धतीनं साजरा केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 13 डिसेंबर: कोरोना प्रतिबंधक लसीचा (Anti covid vaccine) बुस्टर डोस (Booster dose) मिळाल्याचा एका मॉडेलला (Model) इतका आनंद झाला की तिने चक्क समुद्रकिनारा गाठत फोटोशूट (Photo shoot at beach) करून तो साजरा केला. आनंद साजरा करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कुणी घरातल्या घरात आनंद साजरा करतं, कुणी सहलीला जातं, कुणी हॉटेलला जातं, तर कुणी मित्रांसोबत पार्टी करत आपला आनंद शेअर करतं. ब्रिटनच्या एका प्रसिद्ध मॉडेलनंही अनोख्या पद्धतीनं आपला आनंद साजरा केला.

जाहिरात

बुस्टर डोसचा आनंद ब्रिटनमध्ये आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध मॉडेल एलिझाबेथ हर्लेलाही नुकताच बुस्टर डोस देण्यात आला. डोस मिळाल्याचा 56 वर्षांच्या एलिझाबेथला इतका आनंद झाला की तिने अनोख्या पद्धतीने तो साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती एका समुद्रकिनाऱ्यावर गेली आणि आपल्याला आवडणारं बोल्ड फोटोशूट तिने केलं. मॉडेलचा अनोखा अंदाज बीचवर येताना पांढऱ्या गाऊनमधून आलेल्या एलिझाबेथनं बिकीनीमध्ये फोटोशूट करत आपला आनंद व्यक्त केला. बिकीनीमध्ये वेगवेगळ्या पोझ देत तिने आपलं फोटोशूट पूर्ण केलं आणि हे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. या फोटोंना युजर्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून तिचा फिटनेस, रुप आणि स्टाईल यांचे लाखो चाहते त्यावर लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. हे वाचा-  Bhandara: भरलग्नात दोन मित्र आपसात भिडले; सपासप वार करत एकाची हत्या, कारण समोर लसीकरणाबाबत संदेश अद्यापही कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत समाजात गैरसमज आहेत. या गैरसमजांपोटी काहीजण लस घ्यायला जात नाही. लस घेतल्यावर आपल्या तब्येतीत बिघाड होईल किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स होतील, अशी भीती अनेकांना वाटते. या सर्वांची भीती आणि गैरसमज दूर करणं आणि लसीकरण करून घेण्याचा संदेश देण्यासाठीच आपण हा उपक्रम केल्याचं एलिझाबेथनं म्हटलं आहे. तिचं हे फोटोशूट जोरदार व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात