व्हिडिओमध्ये पुढे दिसतं की कोंबड्यानेही अगदी थाटात आपल्या पंजामध्ये चाकू पकडून केक कापला. इतकंच नाही तर हा केक कोंबड्यालाही खायला देण्यात आला. केक कापल्यानंतर उपस्थित सर्वांनीच कोंबड्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनोख्या वाढदिवसाचा हा व्हिडिओ अवघ्या 57 सेकंदाचा आहे. हैराण करणारी घटना कॅमेऱ्यात कैद; थोडक्यात बचावली महिला, पाहा अपघाताचा VIDEO हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच चांगलाच व्हायरल झाला आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओला हजारे व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, मी याआधी कधीही कोंबड्याला केक कापताना पाहिलं नाही. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, कोंबड्याला मारण्याआधी भरपूर खायला-प्यायला दिलं जातं. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.