Home /News /viral /

तिच्यासाठी कायपण! गर्लफ्रेंडसाठी बॉयफ्रेंडने असं काही केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला

तिच्यासाठी कायपण! गर्लफ्रेंडसाठी बॉयफ्रेंडने असं काही केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला

गर्लफ्रेंडला स्पेशल वाटावं म्हणून बॉयफ्रेंडने जगाची पर्वा न करता असं काही केलं की पाहतच राहाल.

  मुंबई, 03 जानेवारी : प्रेमात कपल (Couple love story) एकमेकांसाठी काहीही करायला तयार होतात. बरेच तरुण आपल्या गर्लफ्रेंडला तर अगदी फुलासारखं जपत असतात. तिला स्पेशल वाटेल अशी कोणतीच संधी ते सोडत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ (Couple love video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका बॉयफ्रेंडने आपल्यया गर्लफ्रेंडसाठी (Boyfriend girlfriend) जे केलं ते पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल. तुझ्यासाठी मी आकाशातील चंद्र-तारे तोडून आणेन असे म्हणणारे किती तरी प्रेमी असतात. प्रत्यक्षात हे काही शक्य नाही हे आपल्याला माहितीच आहे. पण या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसाठी जे केलं ते चंद्र-तारे तोडण्यापेक्षाही किती तरी खास आहे. व्हिडीओत पाहू शकता एक कपल फिरताना दिसत आहे. फिरता फिरता ते नदीजवळ पोहोचतात. हे वाचा - ...अन् लग्नानंतर महिलेने तोंडालाच लावली पट्टी; संसार वाचवण्यासाठी विचित्र उपाय नदी दिसताच तरुण आपला पाय नदीच्या एका किनाऱ्यावरील दगडाला टेकवतो आणि दोन्ही हात नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरील दगडाला लावतो. नदीवर तो आडवा होतो. त्यानंतर त्याच्यासोबत असलेली तरुणी त्याच्यावर पाय देते आणि नदीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाते.
  View this post on Instagram

  A post shared by hepgul5 (@hepgul5)

  हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडसाठी नदीवरील पूलही होतो. तरुणी नदीच्या पलिकडे जाताच तिथं थांबते आणि आपल्या बॉयफ्रेंडला हात देऊन त्याला उठवते. त्याचा हात हातात धरते आणि मग दोघंही आपल्या पुढच्या मार्गाला निघून जातात. हे वाचा - VIDEO: खुल्लम खुला प्यार करेंगे, औरंगाबादेत चालत्या दुचाकीवर कपलचा KISSING सीन hepgul5 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. बॉयफ्रेंडचं गर्लफ्रेंडवर असलेलं असं प्रेम अनेकांना आवडलं आहे. तर काही जणांनी हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Boyfriend, Couple, Girlfriend, Relationship, Viral, Viral videos

  पुढील बातम्या