Home /News /viral /

VIDEO: याला म्हणतात खरी मैत्री; कुत्र्याला वाचवण्यासाठी मांजरीनं केलेलं काम पाहून नेटकरीही थक्क

VIDEO: याला म्हणतात खरी मैत्री; कुत्र्याला वाचवण्यासाठी मांजरीनं केलेलं काम पाहून नेटकरीही थक्क

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कुत्र्याला वाचवण्यासाठी एक मांजर दुसऱ्या मांजरीसोबत भिडल्याचं दिसतं. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

    नवी दिल्ली 14 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांच्या व्हिडिओला (Animal Videos) विशेष पसंती मिळते. विशेषतः प्राण्यांच्या भांडणाचा व्हिडिओ तर इंटरनेटवर अपलोड होताच व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक मांजर कुत्र्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मांजरीसोबत भिडल्याचं पाहायला (Cat and Dog Fight Video) मिळतं. आजीनं अचानक केलं आजोबांना KISS; VIDEO मध्ये पाहा आजोबांची प्रतिक्रिया तुम्ही बहुतेकदा कुत्रा आणि मांजर यांना एकमेकांसोबत भांडताना पाहिलं असेल. एकमेकांना बघताच हे प्राणी भांडणासाठी धावून जातात. मात्र, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कुत्र्याला वाचवण्यासाठी एक मांजर दुसऱ्या मांजरीसोबत भिडल्याचं दिसतं. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की जेव्हा कुत्र्याला दुसऱ्या मांजरीपासून वाचवण्याची वेळ येते तेव्हा मांजर बँचवरुन उडी घेऊन बाल्कनीतील मांजरीवर हल्ला करते. ती मांजर दुसऱ्या मांजरीच्या चेहऱ्यावर आपला पंजा मारते आणि तिला जमिनीवर पाडते. मांजरीच्या या मदतीमुळे या संकटातून कुत्रा बाहेर पडतो. मांजर आणि कुत्र्याची ही मैत्री सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. विवाहितेनं Ex-BF सोबत संबंध ठेवत 3 मुलांना दिला जन्म; कारण ऐकून बसेल धक्का एका यूजरनं म्हटलं, की कुत्रा आणि मांजरीची अशी मैत्री याआधी कधीच पाहिली नाही. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, की शत्रूही चांगले मित्र बनू शकतात. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ रेक्स चॅपमॅन नावाच्या एका यूजरनं ट्विटरवर शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत 6.5 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Cat, Dog, Viral video on social media

    पुढील बातम्या