Home /News /viral /

पतीच्या नकळत महिलेनं Ex-Boyfriend सोबत संबंध ठेवत 3 मुलांना दिला जन्म; कारण ऐकून बसेल धक्का

पतीच्या नकळत महिलेनं Ex-Boyfriend सोबत संबंध ठेवत 3 मुलांना दिला जन्म; कारण ऐकून बसेल धक्का

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

महिलेला आपल्या पतीसोबत काहीही अडचण नव्हती. मात्र, तिला आपल्या पतीच्या मुलांना जन्म द्यायचा नव्हता. याचं कारण इतकं अजब होतं, की ते ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल

    नवी दिल्ली 14 सप्टेंबर : असं म्हटलं जातं की प्रेमानं जग जिंकता येतं. कोणाचा चेहरा चांगला नसला तरी मन चांगलं असलं की संपूर्ण आयुष्य अगदी आनंदात जातं. मात्र, आफ्रिकन देश घाणा (Ghana) येथील एका महिलेनं (Married Woman) जे केलं ते वाचून तुमचा प्रेमावरील (Love) विश्वासच उठेल. महिलेनं आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या पतीला फक्त यासाठी धोका दिला कारण तो दिसायला सुंदर नव्हता (Woman Cheated Ugly Husband) . घाणामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं एका मेहनती आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न झालं. महिलेलाही आपल्या पतीसोबत काहीही अडचण नव्हती. मात्र, तिला आपल्या पतीच्या मुलांना जन्म द्यायचा नव्हता. याचं कारण इतकं अजब होतं, की ते ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल. महिलेच्या पतीला आपलं कुटुंब पुढे वाढवायचं होतं. मात्र, महिला पतीला न सांगताच गर्भनिरोधक गोळ्या घेत असे. लग्नमंडपातच नवरदेव-नवरीची मस्ती; VIDEO चा शेवट पाहून आवरणार नाही हसू सुरुवातीला महिलेनं या गोळ्या खात मुलांना जन्म देणं टाळलं. मात्र, जेव्हा ही गोष्ट थेट डॉक्टरांपर्यंत पोहोचली तेव्हा महिलेनं भयंकर शक्कल लढवली. महिलेचं असं म्हणणं आहे, की तिचा पती सुंदर नाही त्यामुळे त्याच्या कुरुप मुलांना जन्म देण्याची तिची इच्छा नव्हती. डॉक्टरांनी पती आणि पत्नी दोघंडी नॉर्मल असल्याचं सांगितल्यानं महिलेला आपली पोलखोल होण्याची भीती वाटू लागली. त्यामुळे तिनं मुलांना जन्म देण्यासाठी आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवले आणि पतीसोबतही ती पत्नीप्रमाणेच राहत होती. कबुतरांच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे ही महिला; वर्षाला खर्च करते लाखो रुपये महिलेचा हा प्लॅन यशस्वी ठरला. तिनं अनेक वर्ष आपल्या पतीला धोका देत एक्स बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवत तीन मुलांना जन्म दिला. प्रियकराला वाटत असे की प्रेयसी बर्थ कंट्रोल पिल्स घेत आहे, तर पतीला वाटत असे की पत्नी त्याच्यासोबत आनंदी आहे. मात्र, जेव्हा ही महिला चौथ्यांदा गरोदर राहिली तेव्हा तिच्यासोबत अशी घटना घडली ज्याची तिनं कल्पनाही केली नव्हती. महिलेच्या पतीला अमेरिकन व्हिसाची लॉटरी लागली. या लॉटरीसाठी कुटुंबीयांची DNA टेस्ट गरजेची होती. अद्याप या टेस्टचा रिपोर्ट समोर आलेला नाही. मात्र, महिलेला सत्य माहिती आहे आणि याचा परिणामही तिला स्पष्ट दिसत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Pregnant woman, Viral news

    पुढील बातम्या