मराठी बातम्या /बातम्या /Viral /पंगा घेणं आलं कुत्र्याच्या अंगाशी; मांजरीनं अद्दल घडवताच ठोकली धूम, पाहा Funny Video

पंगा घेणं आलं कुत्र्याच्या अंगाशी; मांजरीनं अद्दल घडवताच ठोकली धूम, पाहा Funny Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका पाळीव कुत्रा घरातच जोरजोराने मांजरीला भुंकू लागतो. असं वाटतं, की आज हा कुत्रा बाहेर दिसणाऱ्या मांजरीला संपवून टाकेल

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका पाळीव कुत्रा घरातच जोरजोराने मांजरीला भुंकू लागतो. असं वाटतं, की आज हा कुत्रा बाहेर दिसणाऱ्या मांजरीला संपवून टाकेल

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका पाळीव कुत्रा घरातच जोरजोराने मांजरीला भुंकू लागतो. असं वाटतं, की आज हा कुत्रा बाहेर दिसणाऱ्या मांजरीला संपवून टाकेल

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर : सोशल मीडिया (Social Media) आजकाल लोकांच्या मनोरंजनाचं मुख्य साधनच बनलं आहे. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ (Viral Videos) पाहायला मिळतात. यातील अनेक व्हिडिओ हैराण करणारे असतात, तर अनेकदा हे व्हिडिओ हसायला भाग पाडतात.

स्विमिंग पुलमध्ये स्टंटसाठी महिलेनं छतावरुन घेतली उडी पण..; Shocking Video

कुत्रा आणि मांजराचं दुश्मनी तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दोघंही एकमेकांना पाहताच हल्ला करायला सुरुवात करतात. कुत्रा तर मांजर दिसताच तिच्यावर झडप घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, इकडून तिकडे उड्या मारण्यात हुशार असणारी मांजर अनेकदा कुत्र्याच्या हाती लागतच नाही. मात्र, कुत्र्याला समोर बघातच तिथून पळ काढण्यातच मांजर आपलं भलं समजते, हेदेखील तितकंच खरं आहे. मात्र, सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दिसतं की मांजरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न कुत्र्यालात महागात पडतो (Dog and Cat Fight).

View this post on Instagram

A post shared by Tag._.mee (@tag._.mee)

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका पाळीव कुत्रा घरातच जोरजोराने मांजरीला भुंकू लागतो. असं वाटतं, की आज हा कुत्रा बाहेर दिसणाऱ्या मांजरीला संपवून टाकेल. अशात घराचा दरवाजा उघडताच हा कुत्रा मांजरीवर हल्ला करण्यासाठी तिच्याकडे धाव घेतो. मात्र तो मांजरीसमोर येताच मांजर त्याच्यावर जोरानं हल्ला करते आणि कुत्र्यालाच तिथून पळ काढावा लागतो.

हिजाब घातला म्हणून मुंबईत रेस्टो बारमध्ये महिलेला नाकारला प्रवेश, Watch Video

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ tag._.mee नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Cat, Dog, Funny video