मराठी बातम्या /बातम्या /Viral /स्विमिंग पुलमध्ये स्टंट करण्यासाठी महिलेनं छतावरुन घेतली उडी पण...; धडकी भरवणारा VIDEO

स्विमिंग पुलमध्ये स्टंट करण्यासाठी महिलेनं छतावरुन घेतली उडी पण...; धडकी भरवणारा VIDEO

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्विमिंग पुलमध्ये उडी घेण्यासाठी एक महिला आणि एक पुरूष छतावर उभे राहिले आहेत. दोघंही सोबतच तिथून उडी घेतात.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्विमिंग पुलमध्ये उडी घेण्यासाठी एक महिला आणि एक पुरूष छतावर उभे राहिले आहेत. दोघंही सोबतच तिथून उडी घेतात.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्विमिंग पुलमध्ये उडी घेण्यासाठी एक महिला आणि एक पुरूष छतावर उभे राहिले आहेत. दोघंही सोबतच तिथून उडी घेतात.

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. काही लोक फोटो आणि व्हिडिओला लाईक्स मिळावे यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. अनेकजण या नादात स्वतःची हाडं तोडून घेतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. यात पाहायला मिळतं, की एका महिलेला स्विमिंग पुलमध्ये स्टंट (Stunt in Swimming Pool) करणं चांगलंच महागात पडलं.

भररस्त्यात तरुणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा; VIDEO VIRAL झाल्यानंतर...

व्हिडिओमध्ये एक महिला छतावरुन स्विमिंग पुलमध्ये उडी घेताना दिसते. मात्र, सगळं अगदी तसंच घडत नाही, जसं तिनं ठरवलेलं असतं. ती थेट पुलामध्ये पडण्याऐवजी मध्ये असलेल्या शेल्टरवर कोसळते आणि नंतर पाण्यात पडते. हा शॉकिंग व्हिडिओ ट्विटरवर The Darwin Awards नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला मजेशीर कॅपशनही देण्यात आलं आहे. हा हैराण करणारा व्हिडिओ बातमी देईपर्यंत 53 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्विमिंग पुलमध्ये उडी घेण्यासाठी एक महिला आणि एक पुरूष छतावर उभे राहिले आहेत. दोघंही सोबतच तिथून उडी घेतात. मात्र, महिला थेट स्विमिंग पुलमध्ये पडण्याऐवजी आणि मध्ये असलेल्या शेल्टरला धडकते आणि मग स्विमिंग पुलमध्ये पडते. मात्र, पाण्यात कोसळल्यानंतर लगेचच महिला आपला अंगठा दाखवते आणि हे सांगते की सगळं ठीक आहे. मात्र, व्हिडिओ पाहून अंदाज येतो की तिला भरपूर मार लागला असेल.

शी! थुंकी लावून तंदूरी रोटी; ढाब्याचा VIDEO समोर आल्यानंतर परिसरात खळबळ

या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, मी दावा करतो की हिची मान तुटली असणार. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की हा व्हिडिओ मला अजिबातही विनोदी वाटला नाही. त्या महिलेला वाईट पद्धथीनं मार लागला आहे. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Stunt video