मुंबई, 18 ऑक्टोबर: सोशल मीडियावर (Social Media)एक व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ मुंबईतल्या वरळी भागातील आहे. वरळी एका रेस्टॉरंटमध्ये रिडा आणि हिजाब (hijab) घातलेल्या महिलांना प्रवेश नाकारला आहे. इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वरळीच्या (Worli’s Atria Mall )अट्रिया मॉलमधील रेस्टो बार टॅपमध्ये (Tap Resto Bar) महिलेला तिचा हिजाब काढण्यास सांगितलं. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या मित्रांना सांगितलं की, तुम्ही महिलेला हिजाब काढण्यास सांगा.
2 मिनिटांच्या क्लिपमध्ये रेस्टॉरंटचा दुसरा कर्मचारी असं म्हणत आहे की, रेस्टॉरंटमध्ये साड्या नेसून येणाऱ्या महिलांनाही आम्ही परवानगी देत नाही". पुढे ते असंही म्हणताना ऐकू येतंय की, “आम्ही रेस्टॉरंटमध्ये भारतीय पोशाखांना परवानगी देत नाही”. हेही वाचा- देशातील Vaccine चा तुटवडा संपला; राज्यांकडे 10 कोटी डोस शिल्लक, आतापर्यंत इतक्या जणांचं लसीकरण
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्याच्या रेस्टॉरंटच्या या धोरणाबद्दल नेटिझन्सचा रोष व्यक्त केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना, इन्स्टाग्राम यूझर सकिनामाईमूनने लिहिले, “मला आश्चर्य वाटले की असे मूर्ख निर्बंध अजूनही” धर्मनिरपेक्ष “समाजात अस्तित्वात आहेत. आज, माझ्या मैत्रिणीला एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला कारण तिने रिडा, एक प्रकारचा हिजाब घातला होता आणि ते “अयोग्य” असल्यामुळे काढून टाकण्यास सांगण्यात आलं. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.