नवी दिल्ली, 26 मे : तुम्ही पाहिलं असेल की आता माणसांप्रमाणे प्राण्यांचेही बर्थडे साजरे केले जातात. कुत्रे-मांजर पाळणारे, या प्राण्यांवर भरभरून प्रेम करणारे त्यांचा बर्थडेही अगदी थाटात साजरा करतात. आता तर चक्क सिंहाचाही बर्थडे साजरा केला जातो आहे. जंगलाच्या राजाचा बर्थडे म्हणून काही लोक केक घेऊन थेट सिंहाजवळ गेलं. पण त्यानंतर जे घडलं ते भयंकर आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
सिंह इतका खतरनाक की त्याच्यासमोर भलेभले प्राणीही जायला घाबरतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल काही लोक अशा सिंहांना पाळतात. अशाच एक पाळीव सिंह, ज्याचा बर्थडे होता आणि त्याच्या मालकाने तो साजरा करायचा ठरवला. सिंहाच्या बर्थडेसाठी केक आणला, बर्थडे सेलिब्रेशनसाठी पाहुणेही आले.
पण आता सिंहाची बर्थडे पार्टी म्हटलं म्हणजे काहीतरी भयंकर घडणार, याचा क्षणभर तरी विचार मनात येतोच. तेच इथंही घडलं.
शिकार खूप झाली आता सिंहाचा माणसांसोबत 'टग ऑफ वॉर'; कोणी मारली बाजी पाहा थरारक VIDEO
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक सिंह एका घरात बसलेला आहे. त्याच्या आजूबाजूला बरीच माणसं आहेत. एकाच्या हातात केक आहे. सर्वांनी सिंहासोबत पोझ दिली आहे आणि एका ठिकाणी ते पाहत आहेत. कदाचित ते सिंहासोबत फोटो काढत आहे. सिंहही अगदी शांत दिसतो आहे. पण फोटो काढून झाल्यानंतर मात्र असं काही घडतं की तुम्हालाही धडकी भरेल.
केक हात धरून असलेला माणूस सिंहाच्या तोंडाजवळ केक नेतो आणि तो केक त्याच्या तोंडावरच मारतो. तेव्हा सिंह चवताळतो आणि उठून इथून तिथून पळू लागतो. आपल्या पंजांनी तो तोंडावरील केक साफ करताना दिसतो. तर तिथं असलेल्या सर्व माणसांना याची मजा वाटते. ते जोरात हसताना दिसतात.
आजीसाठी 'मृत्यू'शी भिडली नात; 10 वर्षांची मुलगी बिबट्यावर 'वाघिणी'सारखी तुटून पडली
@vikare06 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. काहींनी सिंहासोबत असं काही करताना पाहून भीती व्यक्त केली आहे. काहींनी सिंहाच्या शांतपणाला दाद दिली आहे. तर काहींनी माणसांनी सिंहासोबत केलेल्या या कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे.
Of all the possible things that could happen in this video this is the last thing I imagined pic.twitter.com/uhmp9CwFxU
— (@vikare06) May 11, 2023
तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावर काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birthday, Lion, Viral, Viral videos, Wild animal