मराठी बातम्या /बातम्या /Viral /आजीसाठी 'मृत्यू'शी भिडली नात; 10 वर्षांची मुलगी बिबट्यावर 'वाघिणी'सारखी तुटून पडली

आजीसाठी 'मृत्यू'शी भिडली नात; 10 वर्षांची मुलगी बिबट्यावर 'वाघिणी'सारखी तुटून पडली

नातीने आजीला बिबट्यापासून वाचवलं.

नातीने आजीला बिबट्यापासून वाचवलं.

10 वर्षांच्या नातीने आजीला बिबट्यापासून वाचवलं आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Gujarat, India

अहमदाबाद, 25 मे : मुलांसाठी आई बिबट्याशी भिडल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण आता एक असं प्रकरण चर्चेत आलं आहे. ज्यात चक्क एक नात आपल्या आजीसाठी बिबट्याशी भिडली आहे. बिबट्याच्या जबड्यात आजीला पाहताच एक नात वाघीण बनवली आणि ही वाघिण बिबट्यावर तुटून पडली. गुजरातमधील ही धक्कादायक घटना आहे.

दाहोद जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याचं हे प्रकरण. लिमखेडा तालुक्यातील दाहोद गावात मंगळवारी रात्री एका घरात बिबट्या घुसला. बिबट्याने 60 वर्षीय महिलेवर हल्ला केला. चंपा चौहान असं या महिलेचं नाव. जेव्हा बिबट्या घरात आला तेव्हा सर्वजण गाढ झोपलेले होते. चंपा यांच्या शेजारी त्यांची 10 वर्षांची नात हिरल झोपली होती.

बिबट्याने हल्ला करताच आजी जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागली. आरडाओरडा ऐकून हिरला जाग आली. तिने पाहिलं तेव्हा तिची आजी बिबट्याच्या जबड्यात होती.

अंगाचं पाणी पाणी करणाऱ्या विचित्र जीवाचा VIDEO VIRAL; तुम्ही सांगू शकता हा कोण?

तिने मागचापुढचा कोणताही विचार न करता आजीला वाचवण्यासाठी धाव घेतली. तिच्यासमोर बिबट्याच्या रूपात मृत्यू होता. पण आजीला वाचवण्यासाठी एवढीशी नात बिबट्याशीही भिडली.  तिने आपल्या आजीला घट्ट धरून ठेवलं. बिबट्याची ताकदही या नातीच्या हिमतीसमोर फेल ठरली.  वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही मुलीच्या धाडसाचं कौतुक केलं.

लिमखेडा येथील गेल्या चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. फुलपूर गावात 21 मे रोजी सकाळी बिबट्याने घरात झोपलेल्या दोन मुलींवर हल्ला केला. मुलींच्या वडिलांनी मुलींना वाचवलं. हा तोच बिबट्या असावा, अशी खात्री आम्हाला आहे, असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या मानवभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाडा गावात आणि परिसरात पिंजरा लावला आहे, असंही ते म्हणाले.

दबक्या पावलांनी येत बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार, Video पाहून उडेल थरकाप

अमरेली जिल्ह्यातील भानिया गावातही बिबट्याची दहशत समोर आली आहे. या घटनेत बिबट्याने 39 वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला केला. रात्री ते घराबाहेर झोपले असताना बिबट्याने येऊन त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं.

First published:
top videos

    Tags: Gujrat, Leopard, Local18, Viral, Wild animal