जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शिकार खूप झाली आता सिंहाचा माणसांसोबत 'टग ऑफ वॉर'; कोणी मारली बाजी पाहा थरारक VIDEO

शिकार खूप झाली आता सिंहाचा माणसांसोबत 'टग ऑफ वॉर'; कोणी मारली बाजी पाहा थरारक VIDEO

सिंह आणि माणसात रस्सीखेचचा थरार

सिंह आणि माणसात रस्सीखेचचा थरार

एकटी सिंहिण आणि तिच्यासमोर तीन-तीन बॉडीबिल्डर्स, असा हा रस्सीखेचचा सामना रंगला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 मे : आजवर तुम्ही सिंहाचे शिकारीचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. कधी प्राण्यां ची शिकार तर कधी माणसांवर हल्ला केल्याचंही पाहिलं असेल. पण पहिल्यांदाच माणूस आणि सिंहात टग ऑफ वॉरचा थरार पाहायला मिळाला. सिंहाचा माणसांसोबतचा रस्चीखेचचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. पण सिंहिणीसमोर त्याचं काही चालत नाही. अशाच सिंहिणीशी माणसांनी पंगा घेतला. चक्क सिहिंणीसोबत रस्सीखेच लावली. एकटी सिंहिण आणि तिच्यासमोर तीन-तीन बॉडीबिल्डर्स. मॅन vs लाइनचा हा थरार इतका थरारक की सामना पाहूनच तुमच्या अंगावर शहारा येईल. व्हिडीओत पाहू शकता एका बाजूला हट्टे कट्टे बॉडीबिल्डर रस्सी खेचताना दिसत आहेत. एक-दोन नव्हे तीन-तीन बॉडीबिल्डर्स आहेत. त्यांच्यासमोर आहे ती एकटी सिंहिण. जी पिंजऱ्यात आहे. पिंजऱ्याच्या मधून दोन्ही बाजून ही रस्सी टाकलेली आहे. दोरीचं एक टोक सिंहिणीच्या जबड्यात आहे. तर दुसरं तीन बॉडीबिल्डरच्या सहा हातांमध्ये. तिघंही आपली पूर्ण ताकद लावत आहेत. गजराज म्हणून समोर जात नतमस्तक झाली व्यक्ती, पण जंगली हत्ती चवताळला अन्…; थरकाप उडवणारा VIDEO पण व्हिडीओ पाहिलात तर बॉडीबिल्डर सहा हातांनी ताकद लावून दोऱी खेचूनही दोरी जराही हलवू शकले नाहीत, उलट त्यांचाच पाय घसरत होता. तर त्यांच्यासमोर उभी असलेली सिंहिण मात्र जागच्या जागी आहे. जबड्यात दोरी धरून तीन बिल्डर्सनी इतकी ताकद लावूनही ती जागची काही हलली नाही आहे. शेवटी बिल्डर्सनीही दोरी सोडली आणि हार पत्करली आहे. त्यांनीसुद्धा सिंहिणीच्या जबड्याच्या ताकदीला मानलं आहे. वाघ वाघिणीच्या शिकारीचा थरार, हरणाला खाण्यासाठी दिसली चढाओढ, पाहा कोण जिंकलं? @Figensport नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

व्हिडीओ पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. तुम्हाला हा टग ऑफ वॉर कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात