जाहिरात
मराठी बातम्या / Viral / GFची अट, भेटण्यासाठी महिनाभर 1200 किमी चालत राहिला BF शेवटी...; Valentine Dayलाच आली अशी बातमी

GFची अट, भेटण्यासाठी महिनाभर 1200 किमी चालत राहिला BF शेवटी...; Valentine Dayलाच आली अशी बातमी

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

गर्लफ्रेंडने पायी चालत यायला सांगितलं त्यानंतर 14 जानेवारीपासून हा बॉयफ्रेंड महिनाभर 1400 किमी चालत राहिला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बँकॉक, 15 फेब्रुवारी : नुकताच व्हॅलेंटाईन डे झाला. कित्येकांचं प्रेम बहरलं तर काही जणांचं नुकतंच फुललं आहे. कपल ने एकमेकांना गिफ्ट देऊन, काहीतरी हटके करून हा दिवस साजरा केला. फार फार तर फेब्रुवारी महिना सुरू झाल्यावर अनेकांनी व्हॅलेंटाईन डेची तयारी सुरू केली असेल. पण एक व्यक्ती जी व्हॅलेंटाइन डेच्या मिशनवरच होती. म्हणजे महिनाभरापूर्वीच तिने व्हॅलेंटाईन डेची तयारी केली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ती आपल्या जोडीदाराला भेटण्यासाठी महिनाभर चालत होती. अखेर आता व्हॅलेंटाईन डेलाच त्याच्याबाबत नवी बातमी समोर आली आहे. थायलँडमधील एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही व्यक्ती या व्हिडीओत चालताना दिसत होती. ती चालत आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला पायी जात होती. आता तुम्ही म्हणाल यात काय नवल. आम्हीही जातो की… पण हे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड इतक्या जवळही राहत नाहीत हे पायी जाणं वाटतं तितकं सोपं आहे. नाखोन नायोक प्रांतात या व्यक्तीचं घर आहे. त्याची गर्लफ्रेंड सतून प्रांतात राहते. त्यांच्या ठिकाणातील अंतर जवळपास 1400 किलोमीटर आहे. हे वाचा -  नवऱ्याने बायकोला दिलं असं Valentine gift; जगातील महागात महाग गिफ्टही यासमोर ‘चिल्लर’ वाटेल सुथेव असं या व्यक्तीचं नाव. 52 वर्षांचा सुथेव आणि 56 वर्षांची थनापा यांची भेट सोशल मीडियावर झाली होती. आतापर्यंत ते दोघं एकमेकांना प्रत्यक्ष भेटले नव्हते.  त्यांचं फक्त फोनवर बोलणं होतं, व्हिडीओ कॉलवर दररोज ते एकमेकांशी बोलत होते. तिने त्याला एक चॅलेंज दिलं आणि ते याने स्वीकारलं.  तू माझ्यावर खरं प्रेम करतो तर मला चालत भेटायला ये अशी अट त्याच्या गर्लफ्रेंडने ठेवली होती आणि गर्लफ्रेंडची ती अट पूर्ण करण्याचं त्याने ठरवलं. थायगरने याआधी दिलेल्या वृत्तानुसार टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत या व्यक्तीने सांगितलं, पाच महिन्यांपूर्वी मी टिकटॉकवर तिला भेटलो. प्रत्यक्षात आम्ही कधी भेटलो नाहीत पण दररोज व्हिडीओ कॉलवर बोलतो. ती मला म्हणाली की सतूनपर्यंत मी चालत किंवा पळत यावं आणि माझं प्रेम सिद्ध करावं. मीसुद्धा तिचं आव्हान स्वीकारलं आणि तिच्या घरी जायला रवाना झालो. हे वाचा -  लैला-मजनूची समाधी प्रेमी युगुलांसाठी तीर्थक्षेत्र; पाकिस्तानातूनही येतात लोक, सर्वांनी एकच प्रार्थना 14 जानेवारीला त्याने आपल्या या प्रवासाला सुरुवात केली आहे. 13 फेब्रुवारीला तो सतूनमध्ये पोहोचला आणि 14 फेब्रुवारीला तो गर्लफ्रेंडला भेटला. त्याने तिला प्रपोज केलं आणि लग्नही केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात