जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / नवऱ्याने बायकोला दिलं असं Valentine gift; जगातील महागात महाग गिफ्टही यासमोर 'चिल्लर' वाटेल

नवऱ्याने बायकोला दिलं असं Valentine gift; जगातील महागात महाग गिफ्टही यासमोर 'चिल्लर' वाटेल

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

व्हॅलेटाईन डेदिवशी नवऱ्याने आपल्या बायकोला असं गिफ्ट दिलं ज्यामुळे हे कपल चर्चेत आलं आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : आज व्हॅलेंटाइन डे , प्रेमाचा दिवस. आज तुम्ही तुमच्या लव्हला व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं असेल किंवा तुम्हाला तुमच्या लव्हकडून व्हॅलेंटाईन गिफ्ट मिळालं असेल. यात काही हटके तर काही महागड्या गिफ्टचा समावेश असेल. पण एका नवऱ्याने आपल्या बायकोला असं व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं आहे, ज्यासमोर जगातलं महागातलं महाग व्हॅलेंटाइन गिफ्टही काहीच नाही. असे गिफ्ट या गिफ्टसमोर फेलच आहेत. 48 वर्षांची नामती सारा ढोंगाला तिचा नवरा  रामकुमार थापाने व्हॅलेंटाईन डेचं असं गिफ्ट दिलं. ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. या गिफ्टसमोर तुम्हालाच तुम्ही घेतलेलं किंबहुना जगातलं महागात महाग गिफ्टही अगदी क्षुल्लक वाटेल. आता प्रेम म्हटलं की त्याचा संबंध हृदयाशी येतो. म्हणजे हृदयाला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. मी तुला माझं हृदयही काढून देईन, असे डायलॉग कितीतरी प्रेमवीर मारतात. पण रामकुमारने आपली पत्नी नामतीला आपलं हृदय नाही पण किडनी दिली. हो… आपल्या शरीरातील किडनी काढून त्याने आपल्या बायकोला दिली. व्हॅलेंटाईन डेचं असं अनोखं गिफ्ट देण्यामागे कारणही तसंच आहे. हे वाचा -  अकेले है तो या गम है! सिंगल असलेल्यांना तरुणीची Valentine Day साठी भन्नाट ऑफर दोन वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात नामतीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. ती बऱ्याच कालावधीपासून काही औषधं घेत होती. पण औषधांमुळे तिच्या शरीरावर खाज, सूज येऊ लागली. तिला रुग्णालयात दाखल केलं, तिची तपासणी केल्यावर तिच्या दोन्ही किडनी खराब झाल्याचं निदान झालं.

News18लोकमत
News18लोकमत

डॉक्टरांनी तिला डायलिसिस करण्याचा सल्ला दिला. दोन वर्षांपासून ती डायलिसिसवर होती. पण तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा नव्हती. तिची तब्येत दिवसेंदिवस जास्तच बिघडू लागली. अखेर तिच्या नवऱ्याने तिला आपल्या शरीरातील किडनी काढून दिली. दिल्लीतील सनर इंटरनॅशनल रुग्णालयात सोमवारी ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येलाच हे अमूल्य गिफ्ट देऊन या दाम्पत्याचा व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. हे वाचा -  प्रेम असावं तर असं! HIV ग्रस्त पत्नीनं पतीला दिलं आयुष्य, Video रामकुमार थापा म्हणाला, आम्हाला देव आणि डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे. दरम्यान रुग्णालयाचे डॉक्टर म्हणाले, किडनी प्रत्यारोपणासाठी शक्यतो महिलाच पुढाकार घेताना दिसतात. पण आता पुरुषही पुढे येत आहेत, हे चांगलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात