बँकॉक, 22 जानेवारी : व्हॅलेंटाइन डे जवळ येतो आहे. त्यामुळे तिला किंवा त्याला प्रपोज कसं करू? तिला किंवा त्याला यंदा काय गिफ्ट देऊ? असा विचार तुम्हीही करत असाल. हा वॅलेंटाइन डे खास करायचा विचारही करत असाल. पण तो कसा, तेसुद्धा शोधत असाल. तर काही जण अजून वॅलेंटाइन डेला वेळ आहे, म्हणून अजूनही निवांत असतील. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक व्यक्ती चक्क वॅलेंटाइन डे मिशनवरच आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण तो आपल्या गर्लफ्रेंडसाठी असं काही करतो आहे, की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. थायलँडमधील. एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही व्यक्ती या व्हिडीओत जे काही करताना दिसते आहे ते आपल्या गर्लफ्रेंडसाठी, वॅलेंटाइन डेसाठी करत असल्याचं सांगितलं जातं आहे. आतापर्यंत ते दोघं एकमेकांना प्रत्यक्ष भेटले नाहीत. पण त्यांचं फक्त फोनवर बोलणं होतं, व्हिडीओ कॉलवर दररोज ते एकमेकांशी बोलतात. हे वाचा - हातापाया पडूनही ती ऐकली नाही; शेवटी हतबल BF ने GF च्या लग्नात…; VIDEO VIRAL या व्यक्तीच्या गर्लफ्रेंडने त्याच्याकडे असं काही मागितलं की त्याने ते पूर्ण करण्याचं ठरवलं. तिने त्याला एक चॅलेंज दिलं आणि ते याने स्वीकारलं. किंबहुना निम्मं पूर्णही केलं असं म्हणायला हरकत नाही. तो गर्लफ्रेंडसाठी जे काही करत आहे, त्यामुळे त्याचे फॉलोअर्स वाढले आहेत, लोक त्याच्याला भेटून त्याच्यासोब सेल्फीही घेत आहे, असं सांगितलं जातं आहे. आता असं हा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडसाठी करतो तरी काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. तर हा बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी पायी जात आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवल. आम्हीही जातो की… पण हे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड इतक्या जवळही राहत नाहीत हे पायी जाणं वाटतं तितकं सोपं आहे. नाखोन नायोक प्रांतात या व्यक्तीचं घर आहे. त्याची गर्लफ्रेंड सतून प्रांतात राहते. त्यांच्या ठिकाणातील अंतर जवळपास 1400 किलोमीटर आहे. हे वाचा - ‘आयुष्यभराचं दुखणं दिलं’, बॉयफ्रेंडसह थायलँड ट्रिपवर गेलेल्या तरुणीसोबत भयंकर घडलं थायगरच्या वृत्तानुसार टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत या व्यक्तीने सांगितलं, पाच महिन्यांपूर्वी मी टिकटॉकवर तिला भेटलो. प्रत्यक्षात आम्ही कधी भेटलो नाहीत पण दररोज व्हिडीओ कॉलवर बोलतो. ती मला म्हणाली की सतूनपर्यंत मी चालत किंवा पळत यावं आणि माझं प्रेम सिद्ध करावं. मीसुद्धा तिचं आव्हान स्वीकारलं आणि तिच्या घरी जायला रवाना झालो.
14 जानेवारीला त्याने आपल्या या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याने आपल्यासोबत जॅकेट, टोपी, सनग्लासेस, बादली इत्यादी सामान घेतलं आहे. 14-15 फेब्रुवारीपर्यंत गर्लफ्रेंडच्या घऱी पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न आहे. १४०० किमी पायी जात गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन तो तिला प्रपोज करणार आहे.