मराठी बातम्या /बातम्या /Viral /2 बायका फजिती ऐका! एक झाल्या सवती अन्...; नवऱ्याने विचारही केला नाही ते घडलं

2 बायका फजिती ऐका! एक झाल्या सवती अन्...; नवऱ्याने विचारही केला नाही ते घडलं

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

गुपचूप दोन लग्न करणाऱ्या नवऱ्याची त्याच्या बायकांसमोर पोलखोल झाली आणि त्यानंतर असं काही घडलं ज्याचा त्यानेही कधी विचार केला नसेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

लखनऊ, 22 जानेवारी : पहिली बायको असताना दुसरं लग्न कायद्याने मान्य नसलं तरी काही लोक मात्र गुपचूप दोन लग्न करतात. कित्येक वेळा तर याबाबत त्यांच्या घरच्यांनाही माहिती नसते. दोन लग्न झालेल्या, दोन बायका असलेल्या पुरुषाची काय अवस्था होते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्यक्षात नाही तर फिल्ममध्ये तर तुम्ही पाहिलंच आहे. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. ज्यात दोन लग्न केलेल्या नवऱ्याचं पितळ त्याच्या बायकांसमोर आलं आणि त्यानंतर असं काही घडलं ज्याचा त्यानेही कधी विचार केला नसेल.

उत्तर प्रदेशच्या मुरदाबादमधील हे प्रकरण आहे. ठाकूरद्वारा परिसरातील एका व्यक्तीने दोन लग्न केली. त्याची पहिली पत्नी जिच्यापासून त्याला तीन मुलंही होती. तरी दुसऱ्या महिलेवर त्याचं प्रेम जडलं आणि त्याने तिच्याशी लपूनछपून लग्न केलं. पण नवरा सासरी नेईना म्हणून महिलेने पोलिसात तक्रार दिली आणि त्याची पोलखोल झाली.

हे वाचा - मिशन Valentine's Day! GF साठी BF असं काही करतोय की VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

दुसऱ्या बायकोने आपल्या नवऱ्याविरोधात दोन महिन्यांपूर्वी पोलिसात तक्रार दिली. आपला नवरा लग्नानंतरही आपल्याला सासरी नेण्याऐवजी भाड्याच्या घरात ठेवतो. त्याचवेळी तिला त्याच्या पहिल्या पत्नीबाबत आणि तीन मुलांबाबत समजलं. तेव्हा तिला झटका बसला. 2017 साली फोनवर बोलून त्यांची ओळख झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात. नंतर त्यांनी लग्न केलं. पण त्याने आपलं आधी लग्न झाल्याचं आपल्याला सांगितलं नव्हतं. असं म्हणत तिने त्याच्यावर आपल्याला फसवल्याचा आरोप केला.

अखेर पोलिसांनी ती व्यक्ती आणि तिच्या दोन्ही पत्नींना समोरासमोर आणलं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांची समजूत काढली. नंतर दोन पत्नींमध्ये करार झाला. त्यानुसार दोघींनी आपल्या नवऱ्याचं वाटप केलं. दोघीही बायका सासरी वेगवेगळ्या राहतील. नवरा दोघींनाही सारखा वेळ आणि सारखे पैसे देईल. त्यानुसार एकिकडे तीन दिवस आणि दुसरीकडे तीन दिवस असेल. एक दिवस तो आपल्या मर्जीने राहेल.

हे वाचा - हातापाया पडूनही ती ऐकली नाही; शेवटी हतबल BF ने GF च्या लग्नात...; VIDEO VIRAL

आज तकच्या वृत्तानुसार या करारानुसार दोन्ही सवतींनी एका नवऱ्यासोबत संसार करण्याचं ठरवलं. ज्याचा विचार दोन्ही लग्न आपल्या दोन बायकांपासून लपवणाऱ्या नवऱ्यानेही केला नव्हता.

First published:

Tags: Couple, Relationship, Viral, Wife and husband