मराठी बातम्या /बातम्या /Viral /बोंबला! गर्लफ्रेंडच्या जॉब इंटरव्ह्यूमुळे बॉयफ्रेंड तुरुंगात; पोलिसांनी केली अटक कारण...

बोंबला! गर्लफ्रेंडच्या जॉब इंटरव्ह्यूमुळे बॉयफ्रेंड तुरुंगात; पोलिसांनी केली अटक कारण...

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

गर्लफ्रेंडसाठी बॉयफ्रेंडने असं काही केलं की पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये टाकलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

वॉशिंग्टन, 26 मार्च : प्रेम आंधळं असतं, प्रेमात व्यक्ती काहीही करू शकतात. अशी बरीच प्रेमप्रकरणं तुम्हाला माहिती असतील. आतासुद्धा एक असंच प्रकरण चर्चेत आलं आहे. ज्यामध्ये एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडसाठी असं काही केलं की त्याला त्याची मोठी शिक्षा मिळाली आहे. ही शिक्षा आता तो आयुष्यभर विसरणार नाही. पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये धाडलं आहे.

अमेरिकेच्या फ्लोरिडातील हे प्रकरण. 22 वर्षांचा जेवोन पियरे जॅक्शन आपल्या गर्लफ्रेंडसोबत मर्सिडीज कारमध्ये होता. त्याची गर्लफ्रेंड नोकरीसाठी मुलाखत द्यायला जात होती. जॅक्सन तिला सोडायला जात होता. ते डीग्रूड्ट रोडवर होते. पण जॅक्सनने असं काही केलं की त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या गाडीत जॅक्सन, त्याची गर्लफ्रेंड यांच्यासह आणखी तीन लहान मुलंही होती. या दोघांनी आपल्यासोबत  या 3 मुलांचाही जीव धोक्यात टाकला.

उतावळी नवरी अन्...! लग्नाआधी नवरदेवाने पुरवली नाही 'ती' हौस; तिनं उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी सांगितलं जॅक्सन अति वेगाने कार चालवत होता. तो आपल्या लेनमध्ये नव्हता. चुकीच्या पद्धतीने गाड्यांना ओव्हरटेक करत होता. जॅक्सनच्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात एक पिकअप ट्रकही पलटला. ट्रक आपल्याच लेनमध्ये होता. पण जॅक्सनच्या चुकीमुळे त्याचाही अपघात झाला.

माहितीनुसार जॅक्सन आपल्या गर्लफ्रेंडला एका जॉब इंटरव्यूसाठी नेत होता. मुलाखतीला उशीर झाला होता, त्यामुळे त्याने काळ वेगाने पळवली.  जिथं वाहतूक नियमानुसार प्रति तास 40 किमी वेगाची मर्यादा होती.  तिथं तो तब्बल 160 किमी प्रति तास वेगाने तो ड्रायव्हिंग करत होता. रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांचं हे कृत्य कैद झालं. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलीस तपासात त्याने असं बऱ्याच नियमांचं उल्लंघन केलं आहे. आता जॅक्सनचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ब्रेवार्ड काऊंटी जेलमध्ये त्याला पाठवण्यात आलं आहे.

'तिची कस्टडी मला द्या', विवाहित GF साठी BF ची पुराव्यासह कोर्टात धाव; प्रकरणाचा निकाल काय पाहा

तुम्हीही तुमच्या गर्लफ्रेंडचा, बायकोचा हट्ट, हौस पुरवण्यासाठी असं नको ते काहीही करू नका, नाहीतर तुमच्यावरही अशीच कारवाई होईल.

First published:
top videos

    Tags: America, Boyfriend, Couple, Drive, Girlfriend, Relationships, Viral, Viral news, World news