मराठी बातम्या /बातम्या /Viral /उतावळी नवरी अन्...! लग्नाआधी नवरदेवाने पुरवली नाही 'ती' हौस; तिनं उचललं टोकाचं पाऊल

उतावळी नवरी अन्...! लग्नाआधी नवरदेवाने पुरवली नाही 'ती' हौस; तिनं उचललं टोकाचं पाऊल

नवरीबाईने नवरदेवाकडे लग्नाआधी अशी मागणी केली की नवरदेवाने थेट नकार दिला. हा नकार पचवू न शकलेल्या नवरीने टोकाचा निर्णय घेतला.

नवरीबाईने नवरदेवाकडे लग्नाआधी अशी मागणी केली की नवरदेवाने थेट नकार दिला. हा नकार पचवू न शकलेल्या नवरीने टोकाचा निर्णय घेतला.

नवरीबाईने नवरदेवाकडे लग्नाआधी अशी मागणी केली की नवरदेवाने थेट नकार दिला. हा नकार पचवू न शकलेल्या नवरीने टोकाचा निर्णय घेतला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

    बीजिंग, 25 मार्च : लग्न ठरल्यानंतर बरेच कपल आपल्या संसाराबाबत काही ना काही स्वप्नं रंगवतात. काही कपल अटी ठेवतात किंवा काही ना काही मागणी करतात. अशीच एक महिला जिने लग्नाआधी आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडे असं काही मागितलं की त्याला मोठा धक्का बसला. त्याने तिची ती हौस पूर्ण करण्यास नकार दिला. हा नकार ती पचवू शकली नाही आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. चीनमधील हे प्रकरण आहे.

    झेजियांग प्रांतातील  एका व्यक्तीने सोशल मीडियावर आपली स्टोरी शेअर केली आहे. त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीने लग्नाआधी केलेल्या मागणीला नकार दिल्याने तिने काय केलं ते त्याने सांगितलं. साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार शियाओली असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न ठरलं होतं. पण लग्नाआधी तिने असं काही मागितलं, ज्यामुळे तो हैराण झाला.

    'तिची कस्टडी मला द्या', विवाहित GF साठी BF ची पुराव्यासह कोर्टात धाव; प्रकरणाचा निकाल काय पाहा

    त्याने सांगितलं, ते दोघं चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचं लग्न होणार होतं पण एक दिवस तिने त्याच्याकडे भलतीच मागणी केली. त्याला नोकरीतून जो वार्षिक बोनस मिळत होता, तो लग्नानंतर तिला द्यायचा असं ती म्हणाली. होणाऱ्या बायकोची लग्नाआधीच ही मागणी ऐकून तोसुद्धा हैराण झाला.

    त्याने तिला आणि तिच्या पालकांना समजवण्याचा प्रयत्न केला. आपला पगार जास्त नाही त्यामुळे आयुष्यभरासाठी आपण आपल्या वार्षिक बोनसवरच अवलंबून आहोत. जर सर्व बोनस त्याने तिला दिला तर त्याला त्याच्या लाइफस्टाईलमध्ये खूप बदल करावा लागला. हे त्याने सांगितलं.

    पण कुणीच त्याचं ऐकायला तयार नाही. हेच त्यांचं नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण ठरलं. महिलेने सांगितलं जर त्याने तिला पैसे दिले नाही तर ती त्याच्यावर प्रेम करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. यानंतर त्यांच्यात वाद झाले आणि महिलेने ठरलेलं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या आईवडिलांनी शियाओलीला फोनवरून त्यांच्या मुलीला हे लग्न करायचं नसल्याचं सांगितलं.

    'ब्रेकअप के बाद' व्हाल मालामाल; तुम्ही तुमचं Heartbreak Insurance काढलंय का?

    यानंतरही शिआओलीला आणखी एक मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याला समजलं की त्याची गर्लफ्रेंड त्याच्याशी ठरलेलं लग्न मोडून तिच्या तिच्या एक्स-बॉयफ्रेंडशी लग्न करत आहे.

    First published:
    top videos

      Tags: China, Couple, Relationships, Viral, Wedding