मराठी बातम्या /बातम्या /Viral /'तिची कस्टडी मला द्या', विवाहित GF साठी BF ची पुराव्यासह कोर्टात धाव; प्रकरणाचा निकाल काय पाहा

'तिची कस्टडी मला द्या', विवाहित GF साठी BF ची पुराव्यासह कोर्टात धाव; प्रकरणाचा निकाल काय पाहा

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

विवाहित गर्लफ्रेंडची कस्टडी आपल्याला मिळावी म्हणून बॉयफ्रेंडने कोर्टात याचिका दाखल केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Gujarat, India

अहमदाबाद, 17 मार्च : आपली गर्लफ्रेंड दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न करत असेल तर तिच्या लग्नात जाऊन लग्न रोखण्याचा प्रयत्न करतं, लग्नात किंवा लग्न झाल्यावर तिच्या सासरी जाऊन ड्रामा करणं, अशी बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण एका बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी लग्नमंडप, तिच्या माहेरी-सासरी नव्हे तर चक्क कोर्टात धाव घेतली आहे. पुराव्यांसह त्यांने कोर्टात याचिका दाखल केली आणि गर्लफ्रेंडच्या कस्टडी मागितली. कोर्टानेही यावर निकाल दिला आहे.

गुजरातमधील हे विचित्र प्रकरण आहे. बनासकांठा जिल्ह्यात राहणारा हा तरुण ज्याने आपल्या विवाहित गर्लफ्रेंडची कस्टडी आपल्याला मिळावी यासाठी कोर्टाचा दार ठोठावला. गुजरात हायकोर्टात त्याने याचिका दाखल केली.

याचिकेत त्याने म्हटलं, "माझ्या गर्लफ्रेंडने तिच्या मनाविरुद्ध लग्न केलं आहे. ती बऱ्याच कालावधीपासून तिच्या नवऱ्यासोबत राहतही नाही. तिनं आपल्या नवऱ्यासह सासरही सोडलं. त्यानंतर ती माझ्यासोबत राहत होती. यादरम्यान आमच्यात लिव्ह इन अॅग्रिमेंट झालं होतं." कोर्टात पुरावा म्हणून त्याने त्यांच्यातील लिव्ह इन रिलेशनशिप अॅग्रिमेंट सादर केलं.

'ब्रेकअप के बाद' व्हाल मालामाल; तुम्ही तुमचं Heartbreak Insurance काढलंय का?

कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. कोर्टाने म्हटलं, महिलेने आपल्या नवऱ्याला घस्फोट दिलेला नाही. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप अॅग्रिमेंटच्या आधारावर याचिका दाखल करण्याचा कोणताच अधिकार नाही.

अखेर गर्लफ्रेंडसाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावणं बॉयफ्रेंडलाच भारी पडलं. हे प्रकरण त्याच्यावरच उलटं पडलं. आज तकच्या वृत्तानुसार कोर्टाने या तरुणाला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

First published:
top videos

    Tags: Boyfriend, Couple, Court, Girlfriend, Gujrat, Relationships, Viral, Viral news