• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • वाढदिवसाच्या केकनं वाचवला जीव; बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले दोघं भाऊ, सांगितला घटनेचा थरार

वाढदिवसाच्या केकनं वाचवला जीव; बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले दोघं भाऊ, सांगितला घटनेचा थरार

दुचाकीनं मुलाच्या वाढदिवसासाठी केक आणायला गेलेल्या दोन भावांवर बिबट्यानं हल्ला (Leopard Attack) केला. इतक्यात गाडीवर मागे बसलेल्या व्यक्तीनं हातातील केकचा (Birthday Cake) बॉक्स बिबट्याच्या तोंडावर फेकून मारला.

 • Share this:
  भोपाळ 29 जून : रविवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास दोन जण बिबट्याचे शिकार होता होता वाचले. दुचाकीनं मुलाच्या वाढदिवसासाठी केक आणायला गेलेल्या दोन भावांवर बिबट्यानं हल्ला (Leopard Attack) केला. इतक्यात गाडीवर मागे बसलेल्या व्यक्तीनं हातातील केकचा (Birthday Cake) बॉक्स बिबट्याच्या तोंडावर फेकून मारला. यानंतर बिबट्या दुचाकीचा पाठलाग करू लागला. त्यांनी गाडीचं स्पीडही वाढवलं, तरीही बिबट्या त्यांच्या मागे धावत राहिला. बिबट्यानं उडी घेत गाडी खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळानंतर या बिबट्यानं मागे धावल्याचं पाहताच दोन्ही भावांनी सुटकेचा श्वास घेतला. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बुरहानपुरमधील गोराडिया येथील नेपानगरमधील आहे. Twitter नं हटवला भारताचा चुकीचा नकाशा, जम्मू-काश्मीर आणि लडाख दाखवलेला वेगळा देश गोराडिया येथील रहिवासी फिरोज पिता भिकारी मंसूरी आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी भाऊ साबिर याच्यासोबत केक आणायला नेपानगर येथे गेले होते. केक घेऊन माघारी परतताना सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. साबिर मंसूरी यांनी सांगितलं, की 'मी गाडीवर मागे बसलो होतो. सगळं एकदम अचानक झालं. मला सुरुवातीला तर काहीच समजलं नाही. माझ्या हातात केक होता आणि बिबट्या गाडीवर आपले पंजे मारत होता. गाडी प्रचंड वेगात होती. त्यामुळे, माझ्यापर्यंत त्याचा पंजा पोहोचू शकला नाही. बिबट्यानं तब्बल 500-600 मीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. तेव्हा मी त्याच्या तोंडावर केक फेकून मारला. यामुळे केकचा बॉक्स फाटला. यानंतर बिबट्या अधिकच खवळला आणि आणखीच वेगात पाठलाग करू लागला. मात्र, नशीब चांगलं असल्यानं या हल्ल्यातून आम्ही बचावलो.' LPG Gas Cylinder बुकिंगवर मिळेल 900 रुपयांचा कॅशबॅश, असा घ्या ऑफरचा फायदा जंगलाचा परिसर असल्यानं नेपानगर, नावरा आणि सिव्हिल क्षेत्रात बरेच बिबटे आहेत. याशिवाय इतरही अनेक जंगली प्राणी आहेत. वनविभागानं अनेक ठिकाणी सूचना बोर्डही लावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राणी दिवसादेखील माणसांवर हल्ले करत आहेत. मागील तीन दिवसांपासून नेपानगरमधील आदर्श कॉलनीती लोकही बिबट्याच्या दहशतीमुळे हैराण झाले होते. शुक्रवारी याठिकाणी पिंजरा लावण्यात आला आणि रविवारी सकाळी या बिबट्याला पकडण्यात यश आलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: