नवी दिल्ली 29 जून : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरनं (Twitter) मोठ्या प्रमाणात झालेल्या विरोधानंतर भारताचा चुकीचा नकाशा (Wrong Map of India) आपल्या पेजवरुन हटवला आहे. ट्विटरनं प्रकाशित केलेल्या भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि लडाख (Ladakh) ही दोन भारतातील राज्यं म्हणजे वेगळे देश (Separate countries) आहेत, असं दाखवलं गेलं होतं. याच कारणामुळे ट्विटरचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जाऊ लागला. अखेर आता ट्विटरनं हा नकाशा प्लॅटफॉर्मवरुन हटवला आहे. भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असतानाच हे प्रकरण समोर आलं आहे. श्रीनगरमध्ये चकमक; लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा केंद्र सरकार याप्रकरणी ट्विटरवर कठोर कारवाई करू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरला यासाठी दंडही भरावा लागू शकतो. याशिवाय ट्विटरच्या अधिकाऱ्यांना सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. याआधीही एकदा ट्विटरला देशाचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी इशारा देण्यात आला होता. केंद्रानं म्हटलं होतं, की हे देशाच्या अखंडतेचं प्रकरण आहे. यावेळी ट्विटरनं जम्मू-काश्मीर आणि लेह चीनचा भाग असल्याचं दाखवलं होतं. काय आहे ‘द स्लीपिंग लेडी’ या पर्वतामागचं रहस्य? पाहा PHOTO ट्विटरनं नुकतंच अमेरिकी कायद्यांचा हवाला देत कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट ब्लॉक केलं होतं. आता ट्विटरच्या या चुकीमुळे केंद्र सरकार मोठी कारवाई करू शकतं, असं म्हटलं जात आहे. भारतीय कायद्यांचं ट्विटरनं अनेकदा उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं आहे. ट्विटर भारतातील आयटी कायद्यांचं पालन करत नसल्याचं समोर येत आहे. मात्र, ट्विटरच्या प्रतिनिधीचं असं म्हणणं आहे, की ते कंपनीकडून ठरलेल्या नियमांचं पालन करतात. मात्र, ट्विटरला भारतात आपला कारभार सुरू ठेवायचा असल्यास भारतीय नियमांचं पालन करावं लागेल, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. भारतात आयटी कायदा 26 मे 2021 रोजी लागू झाला आहे. या अंतर्गत इंटरनेट मीडिया चालवणाऱ्या प्रत्येक कंपनीला भारतात काही खास अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची आहे. ट्विटर वगळता जवळपास सर्व कंपन्यांनी ही नियुक्ती केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.