मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /LPG Gas Cylinder बुकिंगवर मिळेल 900 रुपयांचा कॅशबॅश, असा घ्या ऑफरचा फायदा

LPG Gas Cylinder बुकिंगवर मिळेल 900 रुपयांचा कॅशबॅश, असा घ्या ऑफरचा फायदा

या ऑफरचा फायदा भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्यांच्या LPG सिलेंडरवर मिळेल.

या ऑफरचा फायदा भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्यांच्या LPG सिलेंडरवर मिळेल.

या ऑफरचा फायदा भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्यांच्या LPG सिलेंडरवर मिळेल.

नवी दिल्ली, 29 जून : डिजीटल पेमेंट कंपनी पेटीएमने (Paytm) एलपीजी सिलेंडर बुक (LPG Gas Cylinder) करणाऱ्यांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. आता युजर्स IVR, मिस्ड कॉल आणि WhatsApp द्वारेही बुक केलेल्या एलपीजी सिलेंडरचं पेमेंट Paytm ने करू शकतील. Paytm App वरुन LPG cylinder बुक केल्यानंतर युजर्सला आता 3 LPG cylinder बुकवर 900 रुपयांपर्यंतचा कॅशबॅश मिळेल.

या ऑफरचा फायदा भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्यांच्या LPG सिलेंडरवर मिळेल. त्याशिवाय Paytm वर युजर आपल्या गॅस सिलेंडर डिलीवरीला ट्रॅकही करू शकतील. पेटीएम पोस्टपेडवर इनरोल केल्यानंतर युजर्सला सिलेंडर बुकिंसाठी पे लेटरचा (Pay Later) ऑप्शनही मिळेल. 900 रुपयांपर्यंतचा हा कॅशबॅश पेटीएमवर पहिल्यांदा एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहकांनाच मिळणार आहे.

(वाचा - कोणालाही कळणार नाही काय सर्च केलं; Google Search History साठी असा ठेवा पासवर्ड)

असा घेता येईल ऑफरचा फायदा -

- Paytm App च्या होम पेजवर show more ऑप्शनवर टॅप करा.

- त्यानंतर Recharge and Pay Bills सिलेक्ट करा.

- Book a Cylinder वर क्लिक करा.

- तुमच्या गॅस प्रोव्हाईडरची निवड करा, इथे तीन पर्याय भारत गॅस (Bharat Gas), इंडेन गॅस (Indane Gas) आणि एचपी गॅस (HP Gas) पर्याय दिसतील.

- गॅस प्रोव्हाईडर निवडल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी किंवा ग्राहक संख्या टाका.

- त्यानंतर Proceed वर क्लिक करुन पेमेंट करा.

First published:

Tags: LPG Price, Paytm, Paytm offers