नवी दिल्ली 09 मे : जंगली आणि क्रूर प्राण्यांच्या हल्ल्याचे (Wild Animal Attack) अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. बिबट्या हा असाच एक प्राणी आहे, जो शिकारीसाठी अनेकदा मानवी वस्तीच्या भागात शिरताना दिसतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. मात्र यात बिबट्याने जे काही केलं ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. इवल्याशा कुत्र्यासमोर वाघ आणि सिंहाचीही हवा टाईट; श्वानानेच हल्ला करून पळवून लावलं, मजेशीर VIDEO व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Video of Leopard Attack on Rescue Team) पोलिसांच्या गाडीच्या मागे एक बिबट्या दिसत आहे. यादरम्यान काही लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र हा व्हिडिओ पाहून जाणवतं की हे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. कारण यावेळी बिबट्या स्वतःच्या बचावासाठी दोन लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी करतो. हे भयानक दृश्य पाहून नेटकऱ्यांचाही थरकाप उडाला.
Tough day at work for people from police and forest dept.. A couple of them suffered injuries..Salute to their bravery and courage..In the end, everyone is safe..Including the leopard.. pic.twitter.com/wbP9UqBOsF
— Shashank Kumar Sawan (@shashanksawan) May 8, 2022
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी शशांक कुमार सावन यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘पोलीस आणि वन विभागाच्या टीमसाठी हा खूप कठीण दिवस होता. यादरम्यान दोन जण जखमीही झाले आहेत.’ त्यांनी या लोकांच्या धैर्याला आणि जिद्दीला सलाम करत बिबट्यासह इतर सर्वजण सुरक्षित असल्याचंही सांगितलं. चक्क रानडुकरांनी तोडले बिबट्याचे लचके; शिकारीचा हा VIDEO पाहून व्हाल अवाक सध्या वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप पकडून त्याची सुटका केल्याचं व्हिडिओच्या कॅप्शनवरून कळतं. सुदैवाने या काळात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत 4 लाखाहून अधिकांनी व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत बिबट्याला वाचवणाऱ्या वनविभाग आणि पोलीस पथकाच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.