मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - विमानात 'पायलट बाबू'चा बिहारी अंदाज; भोजपुरी भाषेत स्वागत करताच प्रवाशांनी...

VIDEO - विमानात 'पायलट बाबू'चा बिहारी अंदाज; भोजपुरी भाषेत स्वागत करताच प्रवाशांनी...

इंग्रजी, हिंदी नव्हे तर विमानात चक्क भोजपुरीत सूचना.

इंग्रजी, हिंदी नव्हे तर विमानात चक्क भोजपुरीत सूचना.

इंग्रजी, हिंदी नव्हे तर विमानात चक्क भोजपुरीत सूचना.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : तुम्ही विमानाने (Flight) प्रवास केला असेल किंवा फिल्ममध्येही तुम्ही पाहिलं असे की विमानात बसताच पायलट किंवा विमानातील क्रू मेंबर्स आधी सर्व प्रवाशांचं स्वागत करतात त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना देतात. पण शक्यतो त्यांना तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी भाषेत बोलताना पाहिलं असेल. पण कधी कोणत्या प्लेनमध्ये स्थानिक भाषेत बोलताना पाहिलं आहे का? तीसुद्धा भोजपुरी भाषा (Bhojpuri announcement in flight video) विमानात भोजपुरी भाषेत सूजना दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Bhojpuri announcement in Indigo flight).

दिल्लीहून पाटनाला जाणारी ही इंडिगो फ्लाइट (Indigo flight). या फ्लाइटमध्ये पॅसेंजर प्लीज वेलकम, प्रवासीयों का स्वागत है, असं बोलण्याऐवजी विमानातील पायलटने सर्व प्रवाशांचं भोजपुरी भाषेत स्वागत केलं. जे पाहून सर्व प्रवाशांना सुरुवातीला धक्का बसला. पण आपली स्थानिक भाषा ऐकून काही प्रवाशांना आनंदही झाला.

आयएएस अधिकारी अवनीश शरन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'आपली भाषा बोला, वाचा, लिहा आणि प्रोत्साहन द्या', असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

हे वाचा - वडिलांनी मुलाचं नाव ठेवलं ABCDEFGHIJK; सर्टिफिकेट बघून वाटेल आश्चर्य

व्हिडीओत ऐकू शकता, पायलट विमान उड्डाणासाठी केबिनमध्ये जाण्याआधी स्वतः प्रवाशांना सूचना देतो. भोजपुरीत तो म्हणतो, 'सारे लोगन के इंडिगो परिवार की तरफ से रउआ सब लोगन के हार्दिक अभिनंदन करेजा...' फक्त सुरुवातीलाच नाही, तर पायलट जे काही बोलतो ते सर्व भोजपुरीतच बोलतो. शेवटी तो प्रवाशांना भोजपुरी समजली आहे का, हिंदीत पुन्हा सूचना देण्याची गरज आहे का? असंही विचारताना दिसतो. त्यावेळी आपली भाषा ऐकून आनंदित झालेले प्रवासीसुद्धा त्याला दाद देतात.

हे वाचा - 'या'अमेरिकेन पठ्ठ्यानं सलमान खानच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा Video

प्रायव्हेट कंपन्यांनी भारतात टीयर-1 शहरातील लोकांना लक्षात घेऊन आपली विमान सेवा सुरू केली.  टीयर-1 शहरं म्हणजे भारतातील प्रमुख महानगरं जिथं शिक्षित आणि श्रीमंत वर्ग राहतो. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसारख्या शहरात आपल्या सेवेतील अडचण लक्षात घेता कंपन्यांनी टीयर-2 आणि टीयर-3 शहरांकडेही लक्ष वळवलं. त्यानंतर आपल्या काम करण्याच्या पद्धतीत आणि पॉलिसीतही त्यांना बदल करावा लागला. त्यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे क्षेत्रीय भाषेचा जास्तीत जास्त वापर. भाषेमार्फत प्रायव्हेट कंपन्यांनी छोट्या शहरातील लोकांना स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न  केला. हा व्हिडीओसुद्धा त्याचंच एक उदाहरण आहे.

First published:

Tags: Airplane, Delhi, Domestic flight, Patna, Travel by flight, Viral, Viral videos