मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /अरे हे काय! वडिलांनी मुलाचं नाव ठेवलं ABCDEFGHIJK; सर्टिफिकेट बघून वाटेल आश्चर्य

अरे हे काय! वडिलांनी मुलाचं नाव ठेवलं ABCDEFGHIJK; सर्टिफिकेट बघून वाटेल आश्चर्य

त्या पित्याने त्याच्या मुलाचं नाव इंग्रजी वर्णमालेतली (English Alphabets) पहिली 11 अक्षरं ठेवली आहेत.

त्या पित्याने त्याच्या मुलाचं नाव इंग्रजी वर्णमालेतली (English Alphabets) पहिली 11 अक्षरं ठेवली आहेत.

त्या पित्याने त्याच्या मुलाचं नाव इंग्रजी वर्णमालेतली (English Alphabets) पहिली 11 अक्षरं ठेवली आहेत.

  कोणत्याही व्यक्तीचं जन्माच्या वेळी ठेवलेलं नाव (Name) ही त्याची ओळख (Identity) असते. व्यक्तीचं नाव आयुष्यभर आणि त्यानंतरही त्याची सोबत करणार असतं. त्यामुळे नाव हे फार विचारपूर्वक ठेवलं जातं. बहुतांश मुलांची नावं त्यांचे पालक (Parents) ठेवतात. काही विशेष कारण असल्यास एखाद्या मुलाचं नाव जवळचे नातलग ठेवतात. प्रत्येक नावातून काही तरी अर्थबोध व्हावा, असं नाव ठेवण्याचा प्रत्येक पालकाचा प्रयत्न असतो. परंतु, दक्षिण सुमात्रामधल्या (South Sumatra) एका मुलाच्या वडिलांनी त्या मुलाचं नाव असं काही ठेवलं, की जे विचार करण्यापलीकडे आहे. त्या पित्याने त्याच्या मुलाचं नाव इंग्रजी वर्णमालेतली (English Alphabets) पहिली 11 अक्षरं ठेवली आहेत. म्हणजेच त्या मुलाचं नाव ABCDEFGHIJK असं आहे.

  स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी सुमात्रामधल्या एका रुग्णालयात एक मुलगा लसीकरणासाठी (Vaccination) गेला होता. त्या वेळी 12 वर्षांच्या या मुलाचं ओळखपत्र पाहून आरोग्य अधिकारी (Health Officer) क्षणभर आश्चर्यचकित झाले. या मुलाचं नाव पाहून आपली कोणी तरी चेष्टा करतंय असा या आरोग्य अधिकाऱ्यांचा समज झाला. कारण या ओळखपत्रात संबंधित मुलाचं नाव ABCDEFGHIJK जूजू असं लिहिलं होतं. ओळखपत्र पाहून आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या मुलाच्या पालकांना रुग्णालयात बोलावून घेतलं. त्यानंतर मुलाचं खरोखरच नाव ABCDEFGHIJK जूजू असं आहे हे समजल्यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मुलाचे वडील जुल्फाही जूजू यांनी सांगितलं, की `मी माझ्या मुलाचं हेच नाव ठेवलं आहे. माझ्या मुलानं मोठा झाल्यावर लेखक व्हावं, असं मला नेहमी वाटायचं. त्यामुळे मी माझ्या मुलाचं नाव असं ठेवलं आहे; मात्र घरातली मंडळी या मुलाला लाडानं एडेफ या नावानं हाक मारतात.`

  धक्कादायक! संतप्त महिलेने 32 व्या मजल्यावरील दोरी कापून कामगारांना हवेत लटकवलं

  इंडोनेशियातल्या डेटिक या न्यूज साइटने दिलेल्या माहितीनुसार, या मुलाच्या जन्माच्या आधी 6 वर्षं त्याच्या वडिलांनी त्याच्या नावाविषयी विचार करून ठेवला होता. जुल्फाही यांना लेखक (Writer) व्हायचं होतं. परंतु, काही कारणांमुळे त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. आपलं स्वप्न मुलाच्या माध्यमातून पूर्ण व्हावं, असा विचार त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव ABCDEFGHIJK असं ठेवलं.

  इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जुल्फाही त्यांच्या अन्य दोन मुलांची नावं NOPQ RSTUV आणि XYZ अशी ठेवू इच्छित होते. परंतु, काही कारणांमुळे त्यांनी मुलांची नावं अम्मार आणि अत्तूर अशी ठेवली.

  सोशल मीडियावर (Social Media) ही बातमी पोहोचताच ती खूप व्हायरल (Viral) झाली आहे. काही जणांनी या मुलाप्रति सहानुभुती व्यक्त केली. मोठा झाल्यानंतर हा मुलगा त्याचं नाव नक्की बदलणार. वडिलांच्या हट्टासाठी या मुलानं त्याचं आयुष्य वाया घालवण्याची गरज नाही, असं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे. तसंच काही जणांनी त्यांच्या आयुष्यात ऐकलेली विचित्र नावंदेखील शेअर केली आहेत. 'एके दिवशी मला स्ट्रॉबेरी रेन नावाचा माणूस भेटला होता. त्या तुलनेत या मुलाचं नाव अगदीच सामान्य आहे,' असं एका व्यक्तीनं म्हटलं आहे.

  First published:

  Tags: Viral