Home /News /viral /

काय सांगता! शिव्या देणारे लोक जगातात दीर्घायुष्य; आजारांपासूनही राहतात दूर, संशोधनातून खुलासा

काय सांगता! शिव्या देणारे लोक जगातात दीर्घायुष्य; आजारांपासूनही राहतात दूर, संशोधनातून खुलासा

नव्या रिसर्चमध्ये समोर आलं आहे, की जे लोक वारंवार शिव्या देतात, त्यांचं आयुष्य अधिक असतं. शिव्या दिल्यानं त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी होतं (Abusing is Good For Mental Health)

    नवी दिल्ली 25 सप्टेंबर : जगातील काही लोकांना प्रत्येक गोष्टीवर शिव्या देण्याची सवय असते. एखाद्याला शिव्या देण्याची सवय असली की तो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत शिव्या देतो. घरी असो किंवा बाहेर कुठे, हे लोक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शिव्या देताना दिसतील. शिव्या देणारी लोकं तशी तर कोणालाच आवडत नाही. मात्र, आता जो नवा रिसर्च समोर आला आहे तो जाणून तुम्हीही शिव्या देत नसाल तरी त्या द्यायला सुरुवात करताल. नव्या रिसर्चमध्ये समोर आलं आहे, की जे लोक वारंवार शिव्या देतात, त्यांचं आयुष्य अधिक असतं. शिव्या दिल्यानं त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी होतं (Abusing is Good For Mental Health). सोबतच डोकंही शांत राहातं. अशात रिसर्चमध्ये शिव्या देणं आरोग्यासाठी फायद्याचं असल्याचं म्हटलं आहे. हा अभ्यास न्यूजर्सीच्या (New Jersy) कीन युनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सनं केला आहे. यातून असं सिद्ध झालं आहे, की शिव्या देणारे लोक हे समाधानी असतात. टक्कर होताच उडत्या विमानातून पायलटसह प्रवाशांनी घेतल्या उड्या; Shocking Video कीन युनिव्हर्सिटीनं आपल्या या रिसर्चमध्ये (Research) काही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं होतं. या विद्यार्थ्यांचे हात बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवण्यात आले. यात असं समोर आलं, की जे विद्यार्थी या प्रक्रियेदरम्यान शिव्या देत होते, ते आपला हात थंड पाण्यात जास्त काळ ठेवू शकले. याच आधारे रिसर्चसनं आपल्या नव्या अभ्यासात म्हटलं, की शिव्या देणाऱ्या लोकांचं फ़्रस्ट्रेशन कमी होतं आणि माणसाचं डोकंही शांत राहातं. मगरीने तोंडात घट्ट धरून ठेवलं, सुटकेसाठी तरुणीची धडपड; धडकी भरवणारा VIDEO स्ट्रेस कमी (Mental Stress) झाल्यास माणूस अधिक आयुष्य जगतो. स्टडीमध्ये हे समोर आलं, की जे लोक शिव्या देत नाहीत ते कठीण काळात लवकर हार मानतात. ते अधिक मानसिक तणावात असतात आणि याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. अशात आता जर तुम्ही कधी शिव्या देणाऱ्या लोकांना भेटला तर समजून जा की ते तुमच्यापेक्षा अधिक आयुष्य जगणार आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Mental health, Viral news

    पुढील बातम्या