Home /News /viral /

मगरीने तोंडात घट्ट धरून ठेवलं, सुटकेसाठी तरुणीची धडपड; धडकी भरवणारा VIDEO

मगरीने तोंडात घट्ट धरून ठेवलं, सुटकेसाठी तरुणीची धडपड; धडकी भरवणारा VIDEO

भुकेल्या मगरींना खायला द्यायला गेली आणि...

    कॅलिफोर्निया, 25 सप्टेंबर :   मगरीसारखी  (Crocodiles) दिसणाऱ्या छोट्याशा पालीलासुद्धा आपण घाबरतो. मगरीचे तर फक्त व्हिडीओ पाहूनच धडकी भरते. मग मगरींच्या अगदी जवळ जाणं तर दूरच  (Crocodile Attack). पण एक महिला मगरींच्या फक्त जवळच जात नाही तर त्यांना ती खायलाही घालते. असंच तिने एका मगरीला घायला घातलं आणि मगरीने तोंडात घट्ट धरून ठेवलं. त्यानंतर सुटकेसाठी महिलेची धडपड सुरू होती (Crocodiles video). हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मगरींच्या जवळ जाणं, तेसुद्धा त्या भुकेल्या असताना आणि त्यांना आपल्या हाताने खाऊ घालणं म्हणजे मृत्यूच्या दारात जाण्यासारखंच आहे. पण हे आव्हान ही महिला पेलते. भुकेल्या मगरींना खायला देणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कॅलिफोर्नियातील (California) द रेप्टाइल झूमधील (The Reptile Zoo) हा शॉकिंग व्हिडीओ आहे. जो पाहून धडकीच भरेल. एका काचेमध्ये या मगरी बंदिस्त असतात. त्यांना खायला देण्यासाठी एक महिला तिथे येते. ती काचेच्या बॉक्सचा दरवाजा उघडते आणि एका स्टिकमध्ये मांस ठेवून मगरीच्या तोंडात टाकते. मगर आपल्या भल्यामोठ्या जबड्यात मांस तर घेतेच पण सोबत काठीही तशीच तोंडात ठेवते. ती काठी सोडायलाच तयार नाही. महिला किती तरी वेळा तिच्या तोंडातील काठी काढण्याचा प्रयत्न करते. सुटकेसाठी धडपड करत असते. किती तरी वेळाने मगर आपला जबडा उघडते आणि काठी सोडते. तेव्हा कुठे या महिलेच्याही जीवात जीव येतो. हे वाचा - Shocking! कुत्रा-मांजरांसारखं चक्क मगरींनाच खाजवायला गेली; जबड्याजवळ हात नेला आणि... द रेप्टाइल झूच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. दरम्यान ही महिला या मगरीला खायला घालणं आणि मगरींनी असं काही तरी करणं हे तिच्यासाठी नवं नाही. याआधीसुद्धा मगरींना खायला घालताना तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत खायला देण्यासाठी या महिलेने जेव्हा काचेच्या बॉक्सचा दरवाजा उघडला तेव्हा दोन मगरी तिथं धावत आल्या. काचेतून त्या डोकावू लागल्या. महिलेने आपल्या हातातील एका काठीत चिकनचं मांस धरून त्या मगरींच्या तोंडाच्या दिशेने नेलं. एका मगरीने ते मांस तोंडात धरत बाहेरच उडी घेतली. मगर जणू त्या महिलेवर हल्ला करण्याच्या तयारीत होती. हे वाचा - VIDEO - ...आणि मगरीने तिला जबड्यात धरून पाण्यातच खेचलं; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा या महिलेच्या धाडसालाही मानायला हवं. जरी ती हसताना दिसत असली तरी मगरीला असं काही करताना पाहून तिलाही धडकी भरली.  तीसुद्धा घाबरली. तरी तिने दोन्ही मगरींना खायला घातलं आणि नंतर बाहेर पडलेल्या मगरीला पुन्हा पाण्यात सोडण्यासाठी मदतीला एका व्यक्तीला बोलावलं. त्यानंतर दोघांनी मिळून कसंबसं त्या मगरीला आत सोडलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crocodile, Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या