नवी दिल्ली 25 सप्टेंबर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल (Viral on Social Media) होईल हे सांगता येत नाही. सध्या एक आठ वर्ष जुना व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 2013 मधील एका विमान अपघाताचा हा व्हिडिओ (Shocking Video of Plane Crash) आहे. यात दिसतं, की दोन विमानांची हवेतच टक्कर होते. यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी पायलट आणि प्रवाशांनी या विमानातून सुरक्षितपणे उडी मारली. टक्कर झाल्यानंतर यातील एक विमान जमिनीवर कोसळल्याचं दिसलं, तर दुसरं विमान धावपट्टीवर परतलं. याच घटनेचा व्हिडिओ सध्या पुन्हा व्हायरल (Viral Video) झाला आहे. मॉडेलनं स्वतःशीच केला विवाह; या कारणामुळे घेतला मोठा निर्णय त्यावेळी समोर आलेल्या वृत्तानुसार, या घटनेत 9 प्रवासी आणि दोन वैमानिकांपैकी कोणीही गंभीर जखमी झालं नव्हतं. ही दुर्घटना नोव्हेंबर 2013 मध्ये लेक सुपीरियर विस्कॉन्सिनजवळ घडली होती. स्कायडायव्हिंगचे प्रशिक्षक माईक रॉबिन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही विमानं एकत्र उडत होती कारण स्कायडायव्हरला एकत्रच उडी मारायची होती.
फायर फायटर वर्न जॉन्सन यांनी म्हटलं, की मुख्य वैमानिकानं सांगितलं की या विमानाची विंडशील्ड तुटलेली होती. त्यानं उडी मारण्यापूर्वी मोठा आवाज ऐकला. हे विमान हवेत असतानाच तुटलं. मात्र, सुदैवानं यात पॅराशूट असल्यानं कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. याच भयानक घटनेचा व्हिडिओ आता आठ वर्षांनी पुन्हा एकदा ट्विटरवर व्हायरल होत आहे. चवताळलेली मगर पाण्यातून बाहेर रस्त्यावर आली आणि…; धडकी भरवणारा VIDEO 4 दिवसांपूर्वी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला गेला आहे. तेव्हापासून आतापर्यंत हा व्हिडिओ 4 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. 61 हजार जणांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. तर, अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका वापरकर्त्यानं लिहिलं, की हे दृश्य खूपच भीतीदायक होतं, इतक्या मोठ्या अपघातातही सगळे वाचले हे आश्चर्यकारक आहे. दुसऱ्या एकानं कमेंट करत म्हटलं, की यात कोणीही गंभीर जखमी झालं नाही ही विशेष बाब आहे.