मराठी बातम्या /बातम्या /Viral /13 वर्षांपूर्वी गायब झालेला कॅमेरा नदीत सापडला; आत जे दिसलं ते पाहून मालकही शॉक

13 वर्षांपूर्वी गायब झालेला कॅमेरा नदीत सापडला; आत जे दिसलं ते पाहून मालकही शॉक

फोटो सौजन्य - ट्विटर/@fox5sandiego

फोटो सौजन्य - ट्विटर/@fox5sandiego

ज्या व्यक्तीला कॅमेरा सापडला त्या व्यक्तीने तो उघडून पाहिला आणि त्याने तात्काळ त्या कॅमेऱ्याच्या मालकाचा शोध सुरू केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

वॉशिंग्टन, 22 मार्च : आपली एखादी वस्तू हरवली की त्याचं दुःख होतंच. खूप शोधूनही ही वस्तू सापडली नाही तर मग ती वस्तू मिळण्याची आशाही आपण सोडून देतो. पण समजा अशी तुमची हरवलेली आवडती वस्तू अचानक तुम्हाला सापडली तर... साहजिक आनंद होईल. अशाच एका महिलेला तिचा 13 वर्षांपूर्वी गायब झालेला कॅमेरा अचानक सापडला. त्यानंतर त्यात जे दिसलं ते पाहून तीसुद्धा शॉक झाली.

अमेरिकेतील ही घटना, सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.. कोलोराडो नदीत एका मच्छिमाराला एक कॅमेरा सापडला. तो कॅमेरा इतका जुना होता की तो मच्छिमार फेकूनच देणार होता. पण काय कुणास ठाऊक त्याच्या मनात काय आलं. त्याने उत्सुकता म्हणून तो कॅमेरा उघडला. त्यात त्याने जे सापडलं ते पाहून त्याला धक्का बसला. त्याने तात्काळ सोशल मीडियावर याची माहिती दिली आणि याबाबत आपल्याशी संपर्क करण्याचं आवाहन दिलं. त्यावेळी त्याला एका व्यक्तीने संपर्क केला आणि या कॅमेऱ्याचा खरा मालक त्याला सापडला.

लेकाच्या DNA टेस्टमुळे उलगडलं आईचं असं सिक्रेट; मुलासह संपूर्ण कुटुंब हादरलं

कोरल अमयी नावाच्या महिलेचा हा कॅमेरा. 2010 साली ती आपल्या फ्रेंडच्या लग्नात गेली होती. तेव्हा एनिमस नदीजवळ तिचा हा कॅमेरा हरवला होता. या कॅमेऱ्यात तिने बरेच फोटो घेतले होते पण ते कॉम्प्युटरमध्ये अपलोड केले नव्हते. म्हणजे हे फोटो तिच्याकडे कॅमेऱ्याशिवाय दुसरीकडे कुठेच सेव्ह नव्हते. अशात कॅमेरा हरवल्याने ती खूप दुःखी होती.

ज्या व्यक्तीला नदीत हा कॅमेरा सापडला. त्या व्यक्तीचं नाव अँग्लर स्पेन्सर. त्याने फॉक्स 31 शी बोलताना सांगितलं की, मी हा कॅमेरा सापडल्यानंतर तो फेकून देणार होतो. पण उत्सुकता म्हणून मी तो चेक केला आणि त्यातील आठवणी जपून ठेवल्या. कॉम्प्युटरला लावताच मेमरी कार्ड रिड झालं. ज्यात ट्युबिंग ट्रिप, बॅचलर पार्टी आणि लग्नाचे बरेच फोटो होते.

विमानात पाणी मागणारे प्रवासी एअर हॉस्टेसना बिलकुल आवडत नाहीत; करतात राग राग कारण...

अँगलरने या कॅमेऱ्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि हे फोटो ज्यांचे आहेत, त्यांनी आपल्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा असं म्हटलं. एका तासापेक्षाही कमी वेळेत अँगलरला एका व्यक्तीने संपर्क केला. त्या व्यक्तीने या फोटोत असलेली एक महिला आपली पत्नी असल्याचं सांगितलं.

कॅमेऱ्याची मालकिणीला खूप आनंद झाला. 13 वर्षे जुन्या कॅमेऱ्यात तिच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या आठवणी होत्या.

First published:
top videos

    Tags: America, Photo, Social media, Top trending, Viral