मराठी बातम्या /बातम्या /Viral /लेकाच्या DNA टेस्टमुळे उलगडलं आईचं असं सिक्रेट; मुलासह संपूर्ण कुटुंब हादरलं

लेकाच्या DNA टेस्टमुळे उलगडलं आईचं असं सिक्रेट; मुलासह संपूर्ण कुटुंब हादरलं

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

कित्येक वर्षांपासून आईने सर्वांपासून लपवून ठेवलेलं गुपित अखेर मुलानेच उघड केलं आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 19 मार्च : प्रत्येक कुटुंबाचं आणि प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचंही काही ना काही सिक्रेट असतं. अशा काही गोष्टी असतात जे लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांपासूनही लपवून ठेवतात. असे गुपित अचानक समोर आले की सर्वांनाच जबर धक्का बसतो. असाच धक्का बसला तो एका 19 वर्षांच्या तरुण मुलाला. ज्याला दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं नाही तर चक्क त्याच्या आईचं सिक्रेट समजलं. आईचं सिक्रेटही असं की मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डीएनए टेस्टमुळे त्याच्या आईचा राज समोर आला.

19 वर्षांच्या मुलाने सोशल मीडिया साइट रेडिटवर आपल्या कुटुंबातील ही धक्कादायक गोष्ट सांगितली. जी व्हायरल होते आहे. कित्येक वर्षांपासून त्याच्यापासून त्याच्या आईने त्याच्यासह संपूर्ण कुटुंबापासून असं काही लपवलं होतं, ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. जेव्हा हे सत्य त्याला समजलं तेव्हा त्याचं आयुष्यच पूर्णपणे बदललं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार तरुण म्हणाला, बर्थडेला त्याला पॉकेट मनी मिळाला होता. त्या पैशांतून त्याने डीएनए टेस्ट करवून घेतली. त्याचे वडिलही त्याच्यासोबत होते. 8 हजार रुपयांची ही डीएनए टेस्ट ज्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं.

Shocking! 3 वर्षांचा लेक तडफडत होता तरी आई VIDEO बनवत राहिली, चिमुकल्याचा गेला जीव

तरुणाचे डीएनए त्याच्या वडिलांशी फक्त 29.2 टक्केच जुळले. शिवाय ते दोघं सावत्र भाऊ असू शकतात, असंही या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं. या टेस्टमध्ये काही चूक होणार नाही, हे मुलाला माहिती होतं, त्यामुळे तोसुद्धा कन्फ्य़ुझ झाला.  म्हणून त्याने आपल्या चुलत बहिणीचीही डीएनए टेस्ट करवून घेतली. त्या दोघांचा डीएनएही  24.6 टक्के जुळत होता. हेसुद्धा विचित्र होतं. कारण चुलत भावंंडांचा डीएनए फक्त 12 टक्के जुळतो.

तेव्हा असं नक्कीच काहीतरी आहे जे आपल्यापासून लपवलं जा आहे, असा संशय तरुणाला आला. त्याने सर्वांचा संबंध जोडून पाहिला तेव्हा त्याच्या आईचे त्याच्या काकांसोबत अवैध संबंध असल्याचं समजलं. त्याचे खरे वडील त्याचे काका होते.

'तिची कस्टडी मला द्या', विवाहित GF साठी BF ची पुराव्यासह कोर्टात धाव; प्रकरणाचा निकाल काय पाहा

तेव्हा तरुणाने थेट आपल्या आईलाच याबाबत विचारलं. अखेर तिनेही याची कबुली दिली. त्यानंतर तरुणीने आपल्या आईचं घाणेरडं सिक्रेट आपल्या वडिलांसह कुटुंबातील सर्वांना सांगितलं. त्यानंतर त्यांचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्याच्या आईवडिलांमध्ये भांडणं झाली, काकांसोबतही मारहाण झाली.

First published:

Tags: Mother, Parents and child, Relationships, Son, Viral, Viral news