नवी दिल्ली, 19 मार्च : विमान प्रवास म्हटलं की बर्याच जणांना उत्सुकता असते ती एअर हाॅस्टेसना ना पाहण्याची. अगदी शांतपणे, हसत प्रवाशांची सेवा करणार्या या हवाई सुंदरी. प्रवा सी कसेही वागले तरी त्यांच्या चेहर्यावर राग दिसत नाही. पण त्यांच्या या शांत, हसर्या चेहर्यामागे खरं तर राग, संताप असतो, काही विशिष्ट प्रवासी तर त्यांना बिलकुल आवडत नाहीत.
फ्लाइट अटेंडेंट्स काली हर्लोव आणि क्रिस्टीना यांनी एअर हाॅस्टेसना कोणते प्रवासी आवडत नाहीत हे सांगितलं आहे. तसंच विमान प्रवासात प्रवाशांनी काय करू नये, याचीही माहिती दिली आहे.
लेकाच्या DNA टेस्टमुळे उलगडलं आईचं असं सिक्रेट; मुलासह संपूर्ण कुटुंब हादरलं
डेली स्टारशी बोलताना काली हर्लोव म्हणाली, "रागीट प्रवाशांशी डील करणं खूप कठीण होतं. ते कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींसाठीही फ्लाइट अटेंडेंट्सला दोषी ठरवतात. त्यांचा राग आउट ऑफ कंट्रोल होतो. एअरलाइन्सची कोणती चूक असेल तर त्याचा राग ते फ्लाइट अटेंडेंट्सवर काढतात. त्यांची बॅग फिट झाली नाही तरी ती आमची चूक असल्याचं सांगतात. त्यामुळे अशा रागीट प्रवाशांबाबत फ्लाइट अटेंडेंट्सला खूप चीड असते"
फ्लाइट अटेंडेंट क्रिस्टीना म्हणाली, "असे कित्येक लोक फ्लाइटमध्ये येतात जे पुन्हा पुन्हा पाणी मागतात. आम्हाला प्रवाशांची प्रवासात मदत करण्याची ट्रेनिंग दिली जाते. जर तुम्हाला जास्त तहान लागते तर सोबत पाण्याची बाटली ठेवा"
तरुण दिसण्यासाठी 'हा' डॉक्टर करतो 5 गोष्टी, खरं वय जाणून बसेल धक्का
"पाणी देण्याच्या नादात फ्लाइट अटेंडेंट्स ला गरजेची महत्त्वाची कामं करायला मिळत नाहीत. जे प्रवासी फक्त एक ग्लास पाण्यासाठी कॉल बटन दाबतात त्यांचा फ्लाइट अटेंडेंट्स तिरस्कार करतात", असं ती म्हणाली.
त्यामुळे तुम्ही यापुढे फ्लाइटने जाणार असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.