लंडन 4 सप्टेंबर : अमेरिकेतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तसेच तुम्हाला दु:ख देखील होईल. 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 58 वर्षीय ली सेमेन्स्की यांच्या वडिलांचे निधन झाले. ज्यानंतर त्यांनी त्यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी विमान भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील शेवटचा निर्णय ठरला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरंतर सेमेन्स्की यांनी भाड्याने घेतलेलं विमान हे फारच चांगल्या दर्जाचं होतं. त्यांचं हे विमान पाण्यात आणि जमीन असं दोन्ही ठिकाणी उतरु शकत होतं. मात्र तरी सुद्धा हे विमान अपघाताचे बळी ठरलं.
अपघातापूर्वी सेमेन्स्की यांनी आपल्या वडिलांच्या अस्थिकलशाचे विसर्जन केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यासोबत गंभीर अपघात घडला.
हे वाचा : 9 वर्षाच्या मुलानं लढवली अजब शक्कल, घरातून पळाला अन् मोफत केला 2700 किमीचा हवाईप्रवास
सेमेन्स्की यांचं विमान ६१ वर्षीय पायलट जॉन्सन उडवत होते. परंतू हे विमान लँडिंगपूर्वीच क्रॅश झालं.
वैमानिकाशी संपर्क न झाल्याने विमान वाहतूक विभागाने पोलिसांना या विमानाची माहिती दिली. त्यानंतर तपासात त्यांना कळलं की, या विमानाचा अपघात झाला आहे. परंतू या अपघाताचं नेमकं कारण समोर आलं नाही. विमान चांगल्या दर्जाचं असताना देखील असा अपघात घडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती मिळाली. त्यांनी हे कळलं की हे विमान घरगुती होतं. मात्र, अपघाताची नेमकी कारणं शोधण्यासाठी अद्याप तपास सुरू आहे. सोशल मीडियावर देखील या प्रकरणाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking accident, Shocking news, Top trending, Viral news, विमान बेपत्ता