नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : इंटरनेट (Internet) हा माहितीचा अथांग महासागर आहे. तुम्हाला कोणत्याही विषयावर, कोणतीही माहिती हवी असल्यास ती एका क्लिकवर मिळते. इंटरनेटवर विषय सर्च केल्यावर त्याबद्दल असंख्य लेख (Article), व्हिडिओ (Video), माहिती, रिसर्च पेपर (Research Paper) उपलब्ध होतात. अगदी एका क्लिकवर उपलब्ध असलेली ही माहिती खरं तर खूप सोईची आहे. पण हीच माहिती कधीकधी मोठ्या अडचणीचं कारणही ठरू शकते. असाच काहीसा प्रकार ब्राझीलमधील एका 9 वर्षांच्या मुलाबाबत घडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्राझीलमधील एका 9 वर्षांच्या मुलाने गुगलवर (Google) ‘कोणालाही नकळत विमानात प्रवास कसा करायचा’ याबद्दल माहिती शोधली आणि त्याने घरापासून 2700 किमी दूरचा प्रवास केला. या संदर्भात इंडिया टाइम्स डॉट. कॉमने वृत्त दिलंय. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा 9 वर्षांचा मुलगा मनौसमधील (Manaus) त्याच्या घरातून पळून गेला. तो लॅटम एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये (Latam Airlines flight) बसला आणि ग्वारुलहोस, ग्रेटर साओ पाउलो (Guarulhos, Greater Sao Paulo) येथे पोहोचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा लहानगा सर्वसामान्यांच्या नजरेतूनच नाही तर सिक्युरिटीच्या नजरेतूनही सुटला. फ्लाइट ट्रान्झिट इनमध्ये होती जेव्हा क्रू सदस्यांच्या लक्षात आलं की या मुलासोबत कोणीही प्रौढ व्यक्ती नाही. तेव्हा क्रू सदस्यांनी फेडरल पोलीस आणि गार्डियनशिप काउन्सिलला या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर काउन्सिलने मुलाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा - धक्कादायक! विमानात प्रवासी पाठवत होते अश्लिल फोटो, संतापून वैमानिकाने केलं असं काही…पाहा VIDEO शोधानंतर त्या मुलाची ओळख पटवण्यात आली. इमॅन्युअल मार्केस डी ऑलिव्हेरा (Emanuel Marques de Oliveira) असं त्याचं नाव आहे. इमॅन्युअलच्या कुटुंबीयांनी 26 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. रात्री 10 च्या सुमारास त्याच्या आईजवळ फोन आला आणि इमॅन्युअल सापडल्याची माहिती मिळाली. दरम्यान, मुलाला त्या रात्री काउन्सिलच्या शेल्टरमध्ये ठेवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला विमानाने घरी पाठवण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. तसंच हा 9 वर्षांचा मुलगा गुगलवर सर्च करून 2700 किमी अंतरावर कसा पोहोचला? याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दुसरीकडे, तपासात मुलासोबत हिंसाचार, अत्याचार झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही, असं पोलिसांनी सांगितलंय. तो साओ पाउलोमधील त्याच्या नातेवाईकांना भेटायला जाण्यासाठी निघाला असेल, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.