मुंबई 2 सप्टेंबर : आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असतं की, आपल्याकडे खूप पैसे असावेत. ज्याचा वापर करुन आपण आपल्या सर्व गरजा पूर्ण करु. असं काहीतरी रात्रीत अचानक घडावं आणि आपण खूप पैसेवाले व्हावं किंवा आपल्यावर पैशांचा पाऊस पडावा. परंतु हे सगळं तर क्षणीक असतं. कारण याचा आपण फक्त विचार करु शकतो. कारण अशा गोष्टी फक्त स्वप्नात किंवा सिनेमात होऊ शकतात. पण तुम्हाला माहिती असं खरोखर एका कुटुंबासोबत घडलं आहे. होय, या कुटुंबातील एका व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये रातोरात अचानक पैसे आले, हे पाहून त्यांना फार आनंद झाला. ज्यानंतर त्यांनी हे पैसे खर्च केले आणि आपल्या गरजा पूर्ण केल्या. ही घटना ऑस्ट्रेलियातील आहे. येथे कुटुंहबातील एका व्यक्तीच्या खात्यात 8 हजार रुपये येणार होते. परंतू त्या ऐवजी त्यांच्या खात्यात ८२ कोटी रुपये आले. मग काय, या कुटुंबानेही तेच केले, जे इतर सर्वजण सामान्यपणे करतात. या कुटुंबाने त्या पैशांनी खूप खरेदी केली आणि खूप मजा देखील केली. पण नंतर मात्र हे प्रकरण त्यांच्या अंगाशी आलं. हो ही मजा फक्त काही दिवसांचीच होती. कारण या क्रिप्टो कंपनीने त्यांचे पैसे परत मागितले, कारण त्यांनी ते चुकून कुटुंबाच्या खात्यात हस्तांतरित केले होते. हे वाचा : मध्यरात्री महिलेची छेड काढण्यासाठी यायचा ‘भूत’, अखेर कोर्टात समोर आलं या आत्म्याचं रहस्य! ऑस्ट्रेलियातील एका कुटुंबाला क्रिप्टो कंपनी Crypto.com द्वारे चुकून $100 ऐवजी $10.4 दशलक्ष परतावा पाठवला गेला. या आनंदात कुटुंबीयांनी खरेदीला सुरुवात केली, मात्र नंतर कंपनीने कुटुंबाला सर्व पैसे परत मागितले. एवढंच नाही तर क्रिप्टोने हे पैसे व्याजाने पुन्हा मागितले आहे. परंतू या कुटुंबाकडे तेवढे पैसे आता परत द्यायला नाहीयत, ज्यावर क्रिप्टोने या कुटुंबाला कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. हे वाचा : तीन कोटींच्या आलिशान घरातलं `हे` वास्तव पाहून महिलेला बसला धक्का थेवामनोगिरी मॅनिवेल आणि त्याची बहीण दोघेही मेलबर्नचे रहिवासी आहेत. त्यांच्या बँक खात्यात $10,474,143 बॅलेंस दिसल्यावर दोघेही आश्चर्यचकित झाले. त्याच्या खात्यातील अतिरिक्त पैसे हे सिंगापूर-आधारित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे पेमेंट एरर होते हे त्याला सुरुवातीला फारसे माहीत नव्हते. Crypto.com ला त्यांची चूक सुमारे सात महिन्यांनंतर ऑडिट दरम्यान कळाली होती, तोपर्यंत कुटुंबाने हे पैसे खर्च केले होते आणि जेव्हा त्यांना ही माहिती मिळाली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.